पुणे

लिंगाळी येथे प्रशासनाच्या अनास्थेमुळे परवड

CD

दौंड, ता. १० : लिंगाळी (ता. दौंड) हद्दीत रोहित्र चोरीनंतर महिन्याभरानंतर बसविलेले नवीन रोहित्र दुसऱ्याच दिवशी चोरीला गेले. यामुळे पाणी उपलब्ध असूनही पिकांना पाणी देण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतीपंपांची चोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे तर महावितरणकडून त्वरित रोहित्र बसविण्यासाठी टाळाटाळ होत आहे. प्रशासनाच्या या अनास्थेमुळे शेतकऱ्यांची परवड सुरू आहे.
रोहित्र चोरीमुळे पिकांबरोबर शेती पूरक सुक्ष्म उद्योगांना देखील मोठा फटका बसत आहे. महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांचे ऐकून घेतात. मात्र, प्रत्यक्षात विविध कारणे पुढे करून महिनाभर नवीन रोहित्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
लिंगाळी हद्दीतील मसनेरवाडी येथील रोहित्र महिनाभरापूर्वी चोरीला गेले होते. सातत्याने मागणी केल्याने महावितरण प्रशासनाने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोहित्र बसविले. मात्र, दुसऱ्या दिवशी मसनेरवाडी येथील रोहित्रामधील तांबे आणि ऑइल ७ मे रोजी चोरीस गेले. चोरट्यांनी ६३ किलोवॅट क्षमतेचे हे रोहित्र खांबावरून जमिनीवर खाली पाडले. त्यामधील पन्नास हजार रुपये मूल्य असलेले तांबे आणि दहा हजार रुपये किमतीचे ऑइल चोरून नेले. महावितरणचे जनार्दन खरात यांनी या चोरीबाबत दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार अज्ञाताविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दौंड शहर व खोरवडीच्यामध्ये भीमा नदीकाठावरील चार शेतीपंपांची चोरी झाली आहे. शेतकरी राहुल ला. वाबळे व भूषण दिवेकर यांच्या प्रत्येकी दहा अश्वशक्ती क्षमतेच्या दोन मोटारी आणि प्रमोद कुं. जठार व कोंडिबा जानगवळी यांच्या प्रत्येकी पाच अश्वशक्ती क्षमतेच्या दोन मोटारी चोरीस गेल्या आहेत. या चारही मोटारींचे मूल्य सुमारे १ लाख ४० हजार रुपये इतके आहे. या प्रकरणी राहुल वाबळे यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

रोहित्र चोरीसनंतर महिनाभर वीजपुरवठा खंडित होता. पाणी असूनही पिकांना देता आले नाही. मागणी करूनही महावितरणने रोहित्र न दिल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले. नदी काठावरून पाणी घेताना तिथूनही मोटारी चोरीला गेल्या आहेत. महावितरण प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. दौंड पोलिसांनी पण मोटार चोरांचा वेळीच बंदोबस्त करावा.
- काशिनाथ जगदाळे, माजी सभापती - दौंड बाजार समिती.
-----
02365

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT