पुणे

मराठा महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

CD

सासवड, शहर, ता. १३ :जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले. त्याची भरपाई मिळावी. कारण पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असंख्य शेतकरी कुटुंबांचे प्राथमिक उत्पन्नाचे स्त्रोत अवकाळी पावसामुळे संपुष्टात आले आहे. शेतकऱ्यांपुढे त्यांच्या मुलांचे शिक्षण व इतर खर्चासाठी मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे सध्याच्या बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना पिकांची झालेली नुकसान भरपाई मिळावी. यासाठी जिल्हाधिकारी यांना आपल्या स्तरावरून योग्य ते आदेश देऊन तत्काळ पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अजय पाटील, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय पासलकर, पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर, पश्चिम महाराष्ट्र युवक सरचिटणीस केदार वीर, युवक पुणे शहर अध्यक्ष मयुरेश पाटील, युवक पुणे शहर उपाध्यक्ष धनाजी शिंदे, युवक पुणे शहर संपर्कप्रमुख अविनाश बळप, पुणे शहर कार्याध्यक्ष मंगेश साखरे, संपर्कप्रमुख पुणे शहर राजेश केदारी, सरचिटणीस मयूर गुजर, कसबा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अभिषेक जगताप, दुष्यंत राजे जगताप, मंगेश सावंत उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT