पुणे

इंदापुरात डाळिंबाला उच्चांकी भाव

CD

इंदापूर, ता.१५ : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूर येथील मुख्य बाजार येथे सप्ताहात डाळिंब प्रतिकिलो २७५ रुपये या उच्चांकी बाजारभाव प्राप्त झाला. पेरूला ५५ रुपये प्रतिकिलो तर कांदा प्रतिक्विंटल २ हजार २०० दरापर्यंत विक्री झालेली आहे. नवीन ड्रॅगन फ्रुटचीही आवक होऊन ८१ रुपये प्रतिकिलो झालेली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती तुषार जाधव यांनी दिली.
इंदापूर बाजार समितीमध्ये खरेदीसाठी आंध्रप्रदेश, कलकत्ता, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यातील खरेदीदार डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रूट शेतमाल उच्चांकी दरात खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांना सेवा-सुविधा देणेस ही बाजार समिती अग्रेसर आहे. इंदापूर बाजार समिती मुख्यत: भुसार, डाळींब, कांदा, मासे(मासळी), पेरू, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, फुले या शेतमालाच्या आवकेकरीता प्रसिद्ध बाजारपेठ आहे.
दरम्यान, बाजार समितीने उपलब्ध केलेल्या सर्व सोयी-सुविधा, विविध योजना व उपक्रमांचा शेतकरी बांधव व व्यापारी, खरेदीदार यांनी लाभ घ्यावा,असेही आवाहन सभापती तुषार जाधव यांनी केले. यावेळी उपसभापती मनोहर ढुके, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे माजी आमदार यशवंत माने,विलासराव माने, दत्तात्रय फडतरे,मधुकर भरणे,रोहित मोहोळकर,संग्रामसिंह निंबाळकर, संदीप पाटील, रूपाली संतोष वाबळे, मंगल गणेशकुमार झगडे,आबा देवकाते,संतोष गायकवाड,अनिल बागल,दशरथ पोळ, रोनक बोरा,सुभाष दिवसे यांच्यासह प्रभारी सचिव संतोष देवकर उपस्थित होते.
-
05751

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: मला जीवे मारण्याचा प्रयत्न... मास्टरमाईंड चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण गायकवाड यांचा मोठा आरोप, व्हिडिओ पुरावा दाखवला

Stylish Rain Footwear: पावसाळ्यातही स्टायलिश दिसायचंय? कॅज्युअल कपड्यांसोबत घाला 'क्रॉक्स'!

GST Reform: जीएसटीमध्ये होणार मोठा बदल! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Latest Maharashtra News Updates : इगतपुरीतील मनसेच्या ३ दिवसीय शिबिराचा समारोप

दुःखद बातमी: रितेश देशमुखच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, भावनिक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT