इंदापूर, ता. १७ ः येथील हेमलता किसनराव बानकर यांचे निधन झाले. त्यांच्यामागे चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोनार हक्क परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष संजय बानकर, इंदापूर सोनार समाज ट्रस्टचे अध्यक्ष व अष्टविनायक पतसंस्थेचे संचालक महेंद्र बानकर, इंदापूर शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बानकर, तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व श्रीमंत शिवराज मित्र मंडळाचे मार्गदर्शक तुकाराम बानकर हे त्याचे पुत्र होत.
06640