जेजुरी, ता. ७ ः पुणे- पंढरपूर या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा मार्गावरील सासवड ते जेजुरी दरम्यान तक्रारवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत टोलनाक्याचे काम सुरू आहे. टोलवसुली सुरू करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घ्या, अन्यथा टोल सुरू करू दिली जाणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने देण्यात आला आहे.
या मार्गावर काही दिवसांतच या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांकडून टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे . मात्र, या टोलवसुलीबाबत स्थानिक, आसपासचे ग्रामस्थ व भूमिपुत्र यांना विश्वासात घेतले जात नाही. स्थानिक समाजसेवक, लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करून सविस्तर माहिती दिल्याशिवाय टोल वसुली करण्यात येऊ नये, अन्यथा या टोल नाक्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा संभाजी ब्रिगेड जेजुरी शाखेच्या वतीने प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग वारजे माळवाडी कार्यालयाला एका पत्राद्वारे देण्यात आला आहे.
यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अजयसिंह सावंत, शहराध्यक्ष तथा देवसंस्थानचे माजी विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे, कामगार नेते सुरेश उबाळे, सलीम तांबोळी, विलास कड, जिसा संघटनेचे अध्यक्ष विकास पवार, ट्रान्स्पोर्ट युनियनचे विजय पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
याबाबत संदीप जगताप म्हणाले की, महामार्ग विस्तारीकरणासाठी आम्ही स्थानिक भूमिपुत्रांनी जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये काही शेतकऱ्यांचे पूर्ण क्षेत्र गेले असून, या ठिकाणी असलेला उद्योग व्यवसाय नष्ट झाला आहे. या मार्गावरील तक्रारवाडी येथील टोलवसुलीचा ठेका कोणत्या कंपनीला देण्यात आला आहे. वाहन चालकांकडून किती रक्कमेची टोलवसुली करण्यात येणार आहे? कोणत्या वाहन चालकांना टोल वसुलीसाठी सूट करण्यात येणार आहे. पुरंदरमधील आजूबाजूचे स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र, वाहनचालक यांना टोलवसुलीतून किती व कशी सूट देण्यात येणार आहे, आदी सविस्तर माहितीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांनी बैठकीचे आयोजन करून माहिती द्यावी व त्यानंतरच टोल सुरू करण्यात यावा.
03376
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.