पुणे

‘वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी जनजागृतीची गरज’

CD

जुन्नर, ता. ६ : मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी होण्यासाठी प्रत्येक गावात लोकसहभागातून जनजागृती झाली पाहिजे. यासाठी पुढील काळात विद्यार्थ्यांनी वन्यदूत म्हणून काम करावे, असे आवाहन असे जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी येथे केले.
माणिकडोह (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी (ता. ४) बिबट निवारण केंद्राच्या सभागृहात वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात सातपुते बोलत होते. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सहा विद्यालयांतील १२०हून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
सातपुते पुढे म्हणाले की, दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे. कोणताही वन्यजीव स्वत:हून माणसांवर हल्ला करत नाही. त्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण होत आहे असल्याने मानव व वन्यजीव असा संघर्ष उद्भवत आहे.
दरम्यान, सातपुते यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे मानवीय जीवनातील महत्त्व, त्यांच्या संवर्धन व संगोपनाचे महत्त्व सांगितले. मानव व बिबट संघर्ष कसा निर्माण झाला. तो कसा कमी केला जाऊ शकतो याबाबत विद्यार्थांना प्रश्‍नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे, प्राथमिक शाळा गावडेवाडी, गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक, श्री विघ्नहर विद्यालय ओझर, न्यू इंग्लिश स्कूल हिवरे खुर्द आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी वन्यजीवांबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांची वनाधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.
यावेळी साहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्त्व पटवून दिले. वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी बिबट्याच्या जीवनशैलीची चित्रफितीद्वारे माहिती दिली. संजय भोईटे यांनी केलेले बीज संकलन व ५० पक्षांचे पंख संकलन विद्यार्थ्यांनी पहिले. मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे होणारे दुष्परिणाम, वृक्ष लागवड व संवर्धन याबाबत ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेमार्फत जनजागृती करण्यात आली.
यावेळी जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, धनंजय कोकणे, समीर हुंडारे, महेंद्र ढोरे, मनोज तळेकर, सरपंच विजय गावडे, नवनाथ फलके, समीर थिगळे, बिबट निवारण केंद्राचे अधिकारी कर्मचारी व वनरक्षक व वनपाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केले. वनरक्षक पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Announces Tariff: ....अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावलाच!

Ashish Shelar: आनंदाची बातमी! चित्रीकरणासाठी नि:शुल्क परवानगी अन् चित्रपट निर्मिती स्थळांवर...; मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा

ENG vs IND: शुभमन गिल अन् बेन स्टोक्समध्ये पुन्हा टक्कर, ICC ने केली घोषणा

Mahadevi Elephant: माधुरीसाठी नांदणीत दूरस्थ उपचार केंद्र सुरू करणार; सुविधा कोणत्या असणार? जाणून घ्या

Eknath Shinde meet Modi-Shah: दिल्लीत मोदी-शहांशी नेमकी काय चर्चा झाली?, एकनाथ शिंदेंनी मीडियाला सविस्तरच दिलं उत्तर, म्हणाले...

SCROLL FOR NEXT