
मुंबई : माधुरी हत्तिणीच्या वनतारामधील स्थलांतरामुळे जनक्षोभ उसळल्याने अखेर तिची परत पाठवणी करण्याची सशर्त तयारी वनताराने दाखवली आहे. नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून तसेच न्यायालयाच्या परवानगीने कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे.