Ashish Shelar: आनंदाची बातमी! चित्रीकरणासाठी नि:शुल्क परवानगी अन् चित्रपट निर्मिती स्थळांवर...; मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा
Mumbai Filming Permission: सिनेसृष्टीतील लोकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता मुंबईत कुठेही चित्रीकरणासाठी शुल्क मोजावे लागणार नाही. चित्रीकरणासाठी नि:शुल्क परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईतील कोणत्याही ठिकाणावर चित्रीकरणासाठी आता नि:शुल्क परवानगी दिली जाणार आहे. तसेच राज्यातील विविध चित्रपट निर्मिती स्थळांवर सुलभ दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.