पुणे

जुन्नरच्या ८६ हेक्टरमध्ये भात शेतीला फटका

CD

जुन्नर, ता.२२ : जुन्नर तालुक्यात कृषी विभागाच्या पाहणीनुसार परतीच्या पावसाने २८६ शेतकऱ्यांचे सुमारे ८६ हेक्टर क्षेत्रामधील भात पिकाचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे, अशी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले.
घाटघर-नाणेघाट, हिवरे पठार तसेच मढ, कोपरे-मांडवे परिसरात झालेल्या वादळी पावसाने भात पीक शेतात आडवे झाले आहे. काही भागात निसवण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी कापणीस आलेल्या भातास परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.
भात पिकावर अवलंबून असलेल्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक गणित यंदाच्या पावसाने कोलमडून गेले असल्याचे घाटघरचे भात उत्पादक शेतकरी पोपट रावते यांनी सांगितले. परतीच्या पावसाने भात पिकाच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सरपंच दत्ता गवारी यांनी केली आहे.

भात कापणीच्या अवस्थेतील भात पीक भिजल्याने नुकसान झाले आहे तसेच पेंढा वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. परतीच्या पावसाने भातपीक वाया गेल्याने आता वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न  आदिवासी शेतकऱ्यांना पडला आहे.

07672

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ३ महिने आधी समजणार वेळापत्रक; विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबरमध्ये, द्वितीय सत्र परीक्षा मार्चअखेर

विशेष : शब्दांपासून आकर्षक आकृतीपर्यंत

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

SCROLL FOR NEXT