पुणे

काळूबाई शेतकरी कंपनीकडून तळेरानला देशी रोपांची लागवड

CD

जुन्नर, ता.१५ : तळेरान (ता.जुन्नर) येथील काळुबाई आदिवासी शेतकरी कंपनी व आत्माच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली. आत्माचे प्रकल्प संचालक आत्मा सूरज मडके व तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे तसेच निसर्गाचे आपण देणे लागतो या भावनेतून सामाजिक उत्तरदाईत्वातन काळूबाई आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी व आत्मा कृषी विभाग तसेच चाइल्ड वेलफेअर फंड यांनी तळेरान जवळील बोरेचीवाडी येथे देशी प्रजातीची वड,पिंपळ, चिंच,आवळा,सीताफळ,आंबा आदी शंभर हुन अधिक झाडांची रोपे लावली आहेत.
तळेरानचे लोकनियुक्त सरपंच गोविंद साबळे तसेच ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी कंपनीचे अध्यक्ष रामभाऊ लांडे व संचालक तसेच सदस्य, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक सूर्यकांत विरणक, सहाय्यक कृषी अधिकारी सुभाष मडके चाईल्ड फंडचे व्यवस्थापक मदने, रामभाऊ लांडे, आधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सरपंच गोविंद साबळे यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्व सांगितले तसेच लावलेल्या सर्व रोपांचे संगोपन करणार असल्याचे स्पष्ट केले. सरपंच साबळे यांच्या हस्ते झाड लावून वृक्षारोपणाचा प्रारंभ करण्यात आला. आदिवासी भागातील शेतकरी कंपनीच्या या उपक्रमाचे मदणे यांनी कौतुक केले तसेच भविष्यात शेतकरी कंपनीला सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सूर्यकांत विरणक यांनी प्रास्ताविक केले.यांनी आभार मानले.


08775

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: मला जीवे मारण्याचा प्रयत्न... मास्टरमाईंड चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण गायकवाड यांचा मोठा आरोप, व्हिडिओ पुरावा दाखवला

Stylish Rain Footwear: पावसाळ्यातही स्टायलिश दिसायचंय? कॅज्युअल कपड्यांसोबत घाला 'क्रॉक्स'!

GST Reform: जीएसटीमध्ये होणार मोठा बदल! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Latest Maharashtra News Updates : इगतपुरीतील मनसेच्या ३ दिवसीय शिबिराचा समारोप

दुःखद बातमी: रितेश देशमुखच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, भावनिक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT