कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व असणारे
आदर्श गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व
पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय माजी आमदार तथा पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. संजयजी चंदुकाका जगताप सरांचा आज १५ जानेवारी वाढदिवस...! त्यानिमित्ताने आदरणीय सरांना पुरंदर-हवेलीतील जनतेच्या वतीने आरोग्यमय दिर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
- संभाजी विश्वासराव गरुड,
सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक,
सदस्य, ग्रामपंचायत बेलसर (ता. पुरंदर)
अवघे आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित करून सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, वंचित, पीडित, गोरगरिबांची सेवा करताना, ‘काहीही असुद्या-काळजी करू नका’ असा धीर देऊन सदैव मदतीचा हात देणारे आणि दुबळ्यांना बळ देऊन त्यांच्या अन्यायाविरुद्ध कडाडणारे, गावांचे गावपण अन् माणसांचे माणुसकीपण टिकविण्यासाठी सदैव झगडणारे, सर्वसामान्यांच्या काळजात जिद्द, आत्मविश्वास अन् स्वाभिमान पेरणारे सहकार व शिक्षण महर्षी स्व. नामदार चंदुकाका जगताप या आपल्या वडिलांच्या सामाजिक, राजकीय, कृषी व सहकार क्षेत्रातील आदर्श विचार व कर्तृत्वाचा वसा आणि वारसा घेत पुरंदर-हवेलीच्या भूमीत आपल्या दूरदृष्टी व सकारात्मक विचारांच्या बैठकीतून सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये नवविचारांचे आणि विकासाचे परिवर्तन घडविणारे, विकासाचे ध्येय धोरण निश्चित करून त्याचा पाठपुरावा करताना पुरंदर-हवेलीचे कार्यक्षम माजी आमदार सरांनी समस्या समजावून घेत आपल्या कामाचा सुरु ठेवलेला झंझावात सर्वच भागातून कौतुकाचा ठरतोय.
कोरोनाचे संकट असो वा अतिपर्जन्यवृष्टीमुळे आलेली नैसर्गिक आपत्ती असो वा दुष्काळी परिस्थिती असो, या सर्व परिस्थितीत, या संकटकाळी सरांनी अहोरात्र व्यग्र राहून केलेले उत्तम नियोजन आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा मा. राजवर्धिनीताई संजयजी जगताप वहिनीसाहेबांनी ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून भरीव सहकार्यातून केलेली मदत...दिलेला आधार...यामुळे जनतेच्या निश्चयाचं, निर्णयाचं खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याचा भाव सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय.
पुरंदर- हवेलीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्या त्या भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील जनतेच्या समस्या जाणून घेणे...त्यांच्या असलेल्या अडचणींचे निराकरण करण्याच्यासाठी योग्य नियोजन करून शासन दरबारी पाठपुरावा करणे...या कार्यपद्धतीचा अवलंब करून कार्यक्षम...संवेदनशील अन् अभ्यासूपणे केलेल्या भरीव कार्याचे, त्यांच्या विकासकामांचे समाजाच्या सर्वच भागातून स्वागत होतंय. कौतुक होतेय. त्यासाठी अधिकाधिक योग्य नियोजन करून सर्वसामान्य जनतेची...शेतकऱ्यांची..तरुणांच्या रोजगाराची...व्यवसायाची कामे मार्गी लावत असताना संजय सर देत असलेली माणुसकीची जोड यामुळे आपुलकीचं..माणुकीचं नाते अधिक घट्ट होत असल्याचे दिसतेय..प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि त्यांच्याठायी सरांच्या कर्तृत्वामुळे निर्माण झालेला आत्मविश्वास व्यक्त होताना दिसतो.
ग्रामीण जीवनाच्या अडचणी उलगडताना त्यांच्या आयुष्याला स्पर्श करत आता तुम्ही एकटे नाहीत मी तुमच्या बरोबर आहे, हा विश्वास देत युवकांच्या जीवनाला उभारी देणारा सर्वस्पर्शी विचार आणि प्रगतीच्या वाटा आत्मसात करण्याच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन, तसेच सरांचा मनाचा मोठेपणा आणि आपुलकीची हाक ऊर्जा निर्माण करणारी...उमेद वाढविणारी! युवकांनी संयमाने प्रयत्नशील राहून योग्य नियोजन पद्धतीचा अवलंब करून कार्य केले पाहिजे, त्याचबरोबर प्रगतीच्या वाटेवर इतरांना तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा झाली पाहिजे, असे युवकांना उद्योग व्यवसायाबद्दल मार्गदर्शन, सहकार्य तसेच योग्य ती मदत करण्याबरोबरच उद्योग व्यवसायाला अधिकाधिक चालना मिळावी, यासाठी देखील सातत्याने प्रयत्नशील असणारे कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व असे आदर्श गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व...!
पाच वर्षे आमदार नाही तर स्वतःला लोकसेवक म्हणून संबोधायचे, शेतकऱ्यासाठी, युवकांसाठी खूप काही करण्याची उमेद, स्वप्न व्हीजन डोळ्यासमोर ठेवून मार्ग आक्रमक असताना करोनासारखे संकट उभे ठाकले त्यावर मात करून सर्वांना सहकार्य मदतीचा हात देऊन तालुक्याची विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली होती. आता पुढील काळात तिची अंमलबजावणी करून तालुक्याचा विकास हे
एकमेव ध्येय असलेला लोकप्रतिनिधी..
‘मी आमदार नाही तर तुम्ही सर्वजण आमदार आहात’ असे सर्वांना सांगायचे. त्यांच्या अशा अनपेक्षित पराभवाने सर्वजणांना खूप चटका लावून गेला. अशा वेळीही मतदारांचा आभार मेळावा घेऊन त्यांनी सांगितले की, ‘मी आता माझ्यासाठी काही मागत नाही तर तुम्ही काहीही मागा, सांगा...मी सदैव आपल्या सोबत असणार आहे,’ असे सांगत होते आपण जनतेसाठी, कार्यकर्त्यांसाठी, पुरंदर- हवेलीवासीयांसाठी तत्पर असल्याचे दाखवून दिले.
पुरंदर-हवेलीच्या पावण भूमीमध्ये सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने सर्वसामान्यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या न्यायहक्कांसाठी सदैव प्रयत्नशील असणारे पुरंदर-हवेलीचे कुशल नेतृत्व, माजी आमदार मा. संजयजी चंदुकाका जगताप सर आपणास आमचा मानाचा मुजरा आपण शतायुषी व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.