खेड तालुक्याचे अष्टपैलू व दूरदृष्टी नेतृत्व म्हणजे आमदार दिलीपआण्णा मोहिते पाटील. त्यांचा आज वाढदिवस. प्रेमाचे, मायेचे घनिष्ठ संबंध असणाऱ्या माझ्या मार्गदर्शक पालकाला तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील तमाम जनतेच्या वतीने वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
- अभिनाथ शेंडे, मा. ग्रामपंचायत सदस्य, कडूस,
संस्थापक - श्री भैरवनाथ बिगरशेती सहकारी पतसंस्था, कडूस
विकासासाठी झटणारे लढवय्ये, कार्यक्षम व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील. गत वीस वर्षांपैकी मधल्या पाच वर्षांचा कालावधी वगळता तालुक्यात विकास कामांचा धडाका जनतेने अनुभवला आहे. सध्या तालुक्याचा विकासात्मक वेग पाहता अण्णांच्या रूपाने कृतिशील, प्रगल्भ, सर्वगुणसंपन्न द्रष्टा नेता हवा असल्याची पुन्हा एकदा प्रचिती जनतेला आली आहे. ज्याप्रमाणे २०१४च्या विधानसभेचा पराभव विसरून अण्णांनी २०१९च्या विधानसभेला विजय मिळवला, त्याच प्रमाणे पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे अण्णा झेप घेत चमत्कार घडवतील, यावर कार्यकर्त्यांचा अढळ विश्वास आहे. तालुक्यात अण्णा पर्वाला पुन्हा सुरुवात होईल, याची शाश्वती कार्यकर्त्यांना आहे.
अण्णांकडून आमच्यासारख्या तरुणांना खूप काही शिकण्यासारखे आहे. एखाद्या अपयशाने खचून न जाता नव्या दमाने व ताकदीने संकटाचा सामना करण्याची जिद्द अण्णांकडून शिकली पाहिजे. संकटांवर मात करून यशाची चव चाखणारे नेतृत्व तालुक्याला मिळाले आहे. गेल्या वीस वर्षात विकासाच्या माध्यमातून तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. दळणवळणाच्या सोयीसुविधेसोबत तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक व शेतीपूरक विकासाचा पाया अण्णांनी रचला आहे. पश्चिम पट्ट्यातील बांधवांसाठी डेहणे येथे महाविद्यालयाची स्थापना करून या भागातील मुलांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
राजगुरुनगर येथे लॉ कॉलेजची उभारणी केली. पश्चिम पट्ट्यातील बांधवांना उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी म्हणून धरणांतर्गत बंधारे बांधून पाणी अडविण्याची किमया साधली आहे. तालुकाभर रस्त्यांचे जाळे विणले आहे. यासाठी कैक कोटींचा निधी तालुक्याच्या विकासासाठी खेचून आणला आहे. माझा सामाजिक जीवनामध्ये मला नेहमीच आदरणीय अण्णा व ताईंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. माझ्या प्रत्येक निर्णयांमध्ये मोठे बंधू अशोकभाऊ भक्कमपणे पाठीशी असायचे. सामुदायिक विवाह सोहळा, शालेय विद्यार्थ्यांना वह्या व गणवेश वाटप, भव्य रक्तदान शिबिर, क्रीडा तसेच सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक व मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून राबवत असताना अशोकभाऊंची प्रचंड ताकद आम्हा कार्यकर्त्यांच्या मागे उभी असायची. आज मला माझ्या आयुष्यात स्व. अशोकभाऊंची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. कडूसनगरीला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा मिळवून देण्यासाठी भाऊंसोबत अण्णांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे आपण गावातील संपूर्ण रस्ते काँक्रिटीकरण करू शकलो.
अण्णांकडून २४१ कोटींची भरीव तरतूद
गावातील भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना, वाड्यावरील रस्ते, शाळांच्या इमारती, अंगणवाड्या, मंदिरांचे सभामंडप, नदीवरील बंधारे व महत्त्वाचे मोठे मोठे पूल, धर्मशाळेची इमारत, कडूस ते राजगुरुनगर रस्ता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, स्मशानभूमी रोड व दशक्रिया घाट परिसराची विकास कामे झाली. आज देखील कडूस-राजगुरूनगर रस्ता काँक्रिटीकरणासाठी अण्णांनी २४१ कोटींच्या भरीव निधीची तरतूद केली आहे. ही कामे एका दिवसात किंवा एकट्याने करणे शक्य नव्हते. यासाठी जो दृष्टिकोन असावा लागतो तो आदरणीय अण्णा व अशोकभाऊंकडे होता म्हणून आणि म्हणूनच हे शक्य झाले.
अण्णांना तालुक्याच्या विकासाचे जनक व कार्यसम्राट म्हणून उगीच म्हटले जात नाही. विकासाची ही प्रक्रिया अविरत सुरूच राहणार आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित व मागासलोकांच्या आयुष्यात विकासाचा उजेड पडावा, यासाठी सत्तेचा वापर करणाऱ्या आदरणीय अण्णांना वाढदिवसाच्या निमित्ताने शतायुष्य लाभावे,
हीच सदिच्छा.
''नवी क्षितीजे नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर सतत राहो,
जे जे इच्छिले मनी ते पूर्ण होवो.
अण्णा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !''
--------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.