पळसदेव, ता. २३ : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रालगतच्या गावांत शेतकऱ्यांकडून ऊस लागवडीस प्राधान्य दिले जात आहे. सध्या वाफशावरील शेतात सरी काढणे, खत टाकणे, बेणे लावणे यांसारख्या कामांची लगबग सुरू आहे. यामुळे पळसदेव (ता. इंदापूर) परिसरात ऊस लागवड करण्यात शेतकरी व्यग्र आहेत.
उजनी धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये ऊस लागवडीसह खरिपातील पिकांच्या पेरण्यांचा उत्साह दिसत आहे. वर्षाकाठी हक्काचे चार पैसे मिळवून देणारे पीक म्हणून उसाची ओळख आहे. इंदापूर तालुक्यात आडसाली, सुरू, पूर्व हंगामी व खोडवा असे सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली असते. यापैकी उजनीच्या पाणलोटक्षेत्रालगतच्या पुर्नवसित गावांमध्ये अगदी एक एकरापासून ते २० एकरांपर्यंत ऊस लागवड करणारे शेतकरी आहेत.
ऊस लागवड ते तोडणीपर्यंतच्या कालावधीचा विचार केल्यास उसापासून फारसे उत्पन्न मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. उजनीलगतच्या पट्ट्यात वारंवार ऊस लागवडीमुळे एकरी उत्पादनात दिवसेंदिवस घट होत असल्याचे जाणवत आहे.
- संदीप मत्रे, ऊस उत्पादक, पळसदेव
आधारभूत रक्कम वाढवून देण्याची गरज
उस लागवडीसाठी शेतजमीन तयार करण्यापासून ते लागवड करण्यापर्यंत सुमारे चाळीस हजारांहून अधिकचा खर्च करावा लागत आहे. याशिवाय ऊस उगवून आल्यानंतर खते औषधांच्या मात्रा व इतर मेहनतीच्या खर्चाचा अंदाज लावल्यास उसातून फारसे हाती काही शिल्लक राहात नसल्याचा अनुभव आहे. यामुळे कारखानदारांची ऊस उत्पादकांना उसाची किमान आधारभूत रक्कम वाढवून देण्याबरोबर ती एकाच हप्त्याच देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. याशिवाय साखर उताऱ्यानुसार केंद्राने ठरवून दिलेला एफआरपीचा दर देण्याचे टाळण्यासाठी साखर कारखानदार उसाची रिकव्हरी कमी दाखवत आहेत, असा आरोप संदीप मत्रे यांनी केला आहे.
03025
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.