पुणे

गुन्हेगारांवर तिसरा डोळा ठेवणार नजर

CD

कोरेगाव भीमा, ता. २९ : गुन्हेगारांवर वचक तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस ठाणे हद्दीत ''आपले गाव, आपली निगराणी'' मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून ५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गुन्हेगारांवर तिसऱ्या डोळ्याची नजर ठेवण्याचा निर्धार शिक्रापूर पोलिसांनी केला आहे.
या उपक्रमात पतसंस्था, बँका तसेच व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन शिक्रापूरचे नवे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्याचा चार्ज घेताच पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी या नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. याबाबत सांगताना क्षीरसागर म्हणाले, ‘‘कोणताही गुन्हा घडल्यानंतर आरोपींचा शोध तसेच त्यांना शिक्षा होण्यासाठी सीसीटीव्ही चित्रण अनेकदा महत्त्वाचा पुरावा म्हणून उपयुक्त ठरत आहे.’’
शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमासारख्या औद्योगिक पट्ट्यासह ग्रामीण भागाचाही मोठा विस्तार असल्याने महत्त्वाच्या गावात सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या चौकांत पोलिसांच्या मदतीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर असणे गरजेचे आहे. यासाठी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये या तिसऱ्या डोळ्याची नजर राहावी म्हणून "आपले गाव, आपली निगराणी" हा उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत प्रत्येक गावाचा चौक, गल्ली, रस्त्यावर सीसीटीव्हीचे जाळे निर्माण व्हावे, म्हणून लोकसहभागातून ५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा संकल्प आहे. त्यासाठी पोलिसांकडून प्रत्येक ग्रामपंचायत, पतसंस्था, बँका, उद्योजक, रस्त्यालगतचे बंगले तसेच व्यावसायिक दुकानदारांची भेट घेऊन रस्त्याच्या दिशेने एक तरी कॅमेरा लावण्यास सांगितले जात आहे. गावातील पोलिस पाटील तसेच बीट अंमलदार हेही या उपक्रमात पुढाकार घेणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा हा उपक्रम सर्वच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वाधिक उपयुक्त ठरणार असल्याने जास्तीत जास्त ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून या उपक्रमास उत्तम प्रतिसाद द्यावा, असे आवाहन शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT