पुणे

पीएम किसान टेबल सुरू करण्याची दौंडमध्ये मागणी

CD

केडगाव, ता. ९ : दौंड तालुका कृषी विभागाच्या कार्यालयात पीएम किसान टेबल चालू करण्याची मागणी दौंड तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांच्याकडे केली आहे. माने यांना यावेळी मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, तालुक्यातील शेतकरी वर्गाला पीएम किसानबाबत योग्य ती माहिती मिळत नाही. पीएम किसान या केंद्र सरकारच्या योजनेची अडकलेली रक्कम, तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे व त्यांचे पैसे त्यांना वेळेत मिळवून देणे यासाठी पीएम किसान टेबल चालू करणे गरजेचे आहे. यावेळी तालुक्यात शासकीय माती व पाणी परीक्षण सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी ग्राहक पंचायत अध्यक्ष प्रमोद शितोळे, विनय लगड, सोमनाथ सोडनवर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

आजचे राशिभविष्य - 13 मार्च 2026

मूत्रपिंड व मूतखडा

अग्रलेख : जगण्याने छळले होते...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 मार्च 2026

SCROLL FOR NEXT