निमगाव केतकी, ता.७ : तरंगवाडी हद्दीत अनधिकृत उत्खनन करून व्याहळी (ता. इंदापूर) येथे २० हजार ४०० ब्रास मातीचा अनधिकृत साठा केल्याप्रकरणी पंढरपूर येथील आर.एस. हिवरे कंपनीवर इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी एक कोटी सहा लाख ४८ हजार रुपयाची दंडात्मक कारवाईचा आदेश दिला आहे.
तहसीलदारांनी २५सप्टेंबर रोजी दंडात्मक कारवाई संदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, ग्राम महसूल अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालावरून आर.एस. हिवरे कंपनी यांना १६ मे रोजी सुनावणी कामी नोटीस देऊन म्हणणे सादर करण्याची संधी दिली असता. त्यांनी सुनावणी कामी हजर राहून म्हणणे सादर केले. त्यांनी उत्खनन केलेले गौण खनिजासाठी कोणत्याही स्वरूपातील रॉयल्टी भरलेली कोणतीही पावती सादर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी साठवलेली माती साठा हा अनधिकृत असल्याचे स्पष्ट होत आहे दिलेल्या आदेशापासून संबंधित व्यक्तीने दंडाची रक्कम सात दिवसांच्या आत सरकारी खजिन्यात भरावी व न भरल्यास वसुली कारवाई करण्यासाठी संबंधित व्यक्तीवर विविध कलमाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. याबाबत तहसीलदार बनसोडे म्हणाले की, संबंधित कंपनीने व ठेकेदाराने अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही त्यामुळे त्यांच्यावरही लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.