पुणे

गलांडवाडीत कीर्तनसेवेनिमित्त जेवणावळी

CD

खुटबाव, ता. १७ : गलांडवाडी (ता. दौंड) येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आठवडाभर दररोज सायंकाळी महिलांना स्वयंपाकातून सुटका मिळावी म्हणून आठ दिवस गावातील चुली बंद ठेवून गावजेवणाचे आयोजन केले आहे. यानिमित्त दोन हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावामध्ये मुख्य चौकामध्ये बांधलेल्या मंडपामध्ये कीर्तन संपल्यानंतर दररोज सायंकाळी महिला व पुरुषांसाठी एकत्रित जेवणावळी असते.
गलांडवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची ३४ वर्षाची परंपरा आहे. यानिमित्त दररोज रात्री ९.०० ते ११.०० कीर्तन‌ असायचे. या कीर्तनाचा आनंद पुरुषांना घेता यायचा परंतु महिलांना घरातील कामामुळे हा आनंद घेत येत नव्हता. त्यामुळे इच्छा असूनही महिलांना कीर्तनाला येता येत नव्हते. त्यामुळे कीर्तनाला केवळ पुरुषांचीच हजेरी असायची. ही बाब ज्येष्ठ ग्रामस्थ निळकंठ शितोळे यांनी हेरली त्यांनी २०१० मध्ये सप्ताह कमिटी आणि ग्रामस्थांसमोर नवीन प्रस्ताव ठेवला. यामध्ये त्यांनी कीर्तनाची वेळ सायंकाळी ७ ते ९ करण्यात येऊन त्यानंतर सर्वांना जेवणाची सोय करावी असा विचार मांडला. त्याला सर्वांनी मान्यता दिली. याच बैठकीमध्ये गावामध्ये असणाऱ्या ३१५ कुटुंबाचे सात गट करण्यात आले. एका गटामध्ये ४५ कुटुंबाचा समावेश करण्यात आला.
कीर्तन काळातील प्रत्येक दिवस एका गटाला श्रमदान आणि आर्थिक खर्चासाठी दत्तक देण्यात आला. या गटाने सप्ताह काळामध्ये नेमून दिलेल्या दिवशी दिवसभर वीणावादन, स्वयंपाकासाठी स्वयंसेवा, प्रवचन, हरिपाठ, जागर याची जबाबदारी उचलण्याचे नियोजन करण्यात आले. याशिवाय कीर्तनाच्या मानधनाची जबाबदारी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींवर देण्यात आली. कीर्तन झाल्यानंतर पहिली पंगत ही महिलांची होते, त्यानंतर पुरुषांची पंगत होते.

गावातील कीर्तन महोत्सव हा आमच्यासाठी यात्रा महोत्सवासारखा असतो. यानिमित्त राजकीय व वैयक्तिक मतभेद विसरून संपूर्ण गाव एक होते. आठ दिवस गावातील वातावरण धार्मिक झालेले असते. सायंकाळी गावातील कुटुंबे निमंत्रण न देता कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. या उपक्रमाचे महिला वर्गातून विशेष स्वागत करण्यात आले आहे.
विकास महाराज शितोळे, विश्‍वनाथ पवार, संयोजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haj Airfare Hike : हज यात्रेकरूंसाठी महत्त्वाची बातमी! विमानभाड्यात १०,००० ची वाढ; AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी संतापले, केंद्र सरकारवर केली सडकून टीका

Mumbai Local Block: नीट परीक्षेसाठी रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द; मध्य व ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

IPL 2026 : “वैभव सूर्यवंशीची नेमकी कमजोरी शोधणे कठीण”; इयान बिशप यांनी RR च्या युवा फलंदाजाचे केले कौतुक

Mumbai Sea Transport: आखाती तणावाचा मुंबई सागरी वाहतुकीवर फटका; इंधनदरवाढीमुळे रो-रो व फेरी बोटींच्या भाडेवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT