पुणे

भागीदारीच्या आमिषाने एकाला सव्वादोन कोटी रुपयांचा गंडा

CD

लोणी काळभोर, ता. १२ : पाण्याच्या बॉटलिंग प्लांटमध्ये भागीदारी देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची २ कोटी ३४ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद मदनलाल लाहोटी (रा. हडपसर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून राजेश सत्यनारायण काबरा (वय ५४) व रोहित राजेश काबरा (वय ३०) यांना अटक करण्यात आली असून, प्रतीक काबरा हा फरार आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये आरोपींनी लाहोटी यांना बॉटलिंग व्यवसायात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे को-पॅकेजिंग व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त केले. फेब्रुवारी २०२५ मध्ये भागीदारी फर्म स्थापन करून प्लांट उभारणी, यंत्रसामग्री आणि परवान्यांसाठी लाहोटी यांनी २ कोटी ३४ लाखांची गुंतवणूक केली. जून ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान ६० लाखांचे उत्पादन होऊनही फर्मच्या खात्यात केवळ ५.१९ लाख रुपये जमा झाले. उर्वरित रक्कम आरोपींनी स्वतःकडे वळवल्याचे तपासात निष्पन्न झाले. लाहोटी यांनी हिशोब मागितला असता आरोपींनी टाळाटाळ केली आणि प्लांटमधील यंत्रसामग्रीही परस्पर विकून टाकली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लाहोटी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT