पुणे

आंबेगाव-जुन्नरकरांनो, जागते रहो...

CD

मंचर, ता. १६ : आंबेगाव व जुन्नर तालुक्यात दिवसा व रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बंद घराची कुलपे तोडून, तसेच प्रवासात बॅगमधील महिलांचे दागिने लांबविणे, दुचाकी वाहनांच्या चोऱ्या, ज्येष्ठांना रस्त्यावर भुरळ पडून पैसे व दागिने पळवणे, अशा प्रकारच्या घटना गेली १५ दिवस सतत या भागात घडत आहेत. पोलिस यंत्रणेला आरोपी पकडण्यात अद्याप यश आले नाही.
सध्या लग्नसराई सुरू आहे. तसेच, उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे अनेक कुटुंब नातेवाइकांना भेटण्यासाठी, विविध कार्यक्रमासाठी व पर्यटन व तीर्थक्षेत्र दर्शनासाठी बाहेर गावी जात आहेत. या संधीचा गैरफायदा या भागातील चोरट्यांच्या टोळ्या घेत आहेत. प्रामुख्याने मंचर, नारायणगाव, जुन्नर व ओतूर आदी शहरांमध्ये बंद घरे व बंगले हेरून भरदिवसा कडी-कोंयडा व कुलपे तोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या घटना घडल्याच्या नोंदी पोलिस ठाण्यात झाल्या आहेत. तसेच, महिलांचीही टोळी सक्रिय झाली आहे. महिला किंवा पुरुष दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेऊन त्यांच्याच दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
मंचर, नारायणगाव, आळेफाटा बसस्थानकावरून एसटी बसमध्ये प्रवेश करत असताना महिलांनी सुरक्षितपणे बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामध्ये आरोपी महिला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहेत. ‘चोरांचा उपद्रव वाढला आहे आम्ही पोलिस आहोत. तुमचे दागिने सुरक्षित ठेवा,’ असे सांगून भुरळ पडून ज्येष्ठांचे दागिने व रोख रक्कम लुटली जात आहे. दुचाकी चोरीच्या घटना तर दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या सर्व प्रकारांमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.
या कामी पोलिस यंत्रणेने तातडीने उपाययोजना हाती घेऊन आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष रमेश खिलारी यांनी केली.

आंबेगाव व जुन्नर तालुक्यात चोरट्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृतीची मोहीम सुरु केली आहे. बाहेर गावी जाताना शेजाऱ्यांना किंवा गृहनिर्माण सोसायटीच्या कार्यालयात माहिती द्यावी. मंचर, नारायणगाव, जुन्नर, ओतूर, आळेफाटा, घोडेगाव बसस्थानकावर साध्या वेशात महिला व पुरुष पोलिसांचे पथक कार्यरत केले आहे. राजगुरुनगर बसस्थानकावर ध्वनीक्षेपकाद्वारे प्रवाशांमध्ये जनजागृती केली जाते. प्रत्येक दुकानदाराने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना दिल्या आहेत. पोलिस असल्याचे बनावट सांगणाऱ्याचा शोध पोलिस घेत आहेत. संशयास्पद वावरणाऱ्या व्यक्ती किंवा माहिलांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. गुन्हेगारांना लवकरच जेरबंद केले जाईल.
- मंदार जावळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, जुन्नर
- सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, खेड (राजगुरुनगर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT