पुणे

साईनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी समदडीया

CD

मंचर, ता.१६ : श्री साईनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जया गिरीश समदडीया यांची बिनविरोध निवड झाली. सहकार खात्याचे सहाय्यक जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय ससाणे व सोनाली देसाई यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया झाली.
गिरीश कुमारपाल समदडिया हे श्री साईनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेपासून संस्थापक/अध्यक्ष होते. त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया शनिवारी (ता. १५) पतसंस्थेच्या कार्यालयात झाली. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, संचालक वसंतराव बाणखेले, नरेंद्र धुमाळ, नंदकुमार पडवळ, मंगेश पवळे, यावरअली मिर, तय्यब जमादार, राजेंद्र थोरात, श्वेता यशराज काळे पाटील, निलम अनिल पोखरकर उपस्थित होत्या.
(स्व) गिरीश समदडीया यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर जया समदडिया यांचा सन्मान पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक दिलीप शर्मा, गिरीश राठोड, आशिष पुंगलिया, तन्मय समदडिया, निरज समदडिया, यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष लेखा परीक्षक एस. एस. पुंडे यांनी अभिनंदन केले.
‘‘व्यावसायिक, बेरोजगार युवक व महिला बचत गटांना उद्योग व्यवसायाला प्राधान्याने कर्ज दिले जाईल,’’असे जया समदडिया यांनी सांगितले. आशिष पुंगलिया यांनी प्रास्ताविक व वसंतराव बाणखेले यांनी आभार मानले.

साईनाथ पतसंस्थेचा भाग भांडवल चार कोटी १८ लाख ६० हजार रुपये, ठेवी १३३ कोटी ४९ लाख रुपये, निधी २४ कोटी १६ लाख ७७ हजार रुपये, गुंतवणूक ५४ कोटी १९ लाख ४५ हजार रुपये, कर्ज वाटप ९६ कोटी ५८ लाख ८६ हजार रुपये, खेळते भांडवल १६५ कोटी १६ लाख ९७ हजार रुपये, एकूण व्यवसाय २२९ कोटी ६३ लाख ७७ हजार रुपये, डिसेंबर २०२४ अखेर नफा १६५ कोटी वीस लाख रुपये.
- दिलीप शर्मा, मुख्य व्यवस्थापक साईनाथ पतसंस्था मंचर.

12551

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT