पुणे

पेठमध्ये चोरटा जेरबंद; ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

CD

मंचर, ता. २९ : पेठ (ता. आंबेगाव) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून बारा हजार रुपये रोख रक्कम काढून घरी जाणाऱ्या गीताबाई शंकर काळे (वय ७५, रा. कारेगाव) व बंधू शिवाजी नवले (रा. भावडी) यांच्याजवळील रक्कम दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चोरली. या घटनेचा मंचर पोलिसांनी २४ तासांत छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून रोकड व चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
बुधवारी (ता.२३) दुपारी दीड वाजता गीताबाई यांनी पेठ पुणे जिल्हा बँकेतून रक्कम काढली. रक्कम व पासबुक त्यांनी नवले यांच्या पिशवीत ठेवले होते. त्यानंतर दोघे कारेगावकडे पायी निघाले असताना मागून आलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी नवले यांच्याकडील पिशवी हिसकावून नेली. याप्रकरणी शुक्रवारी (ता. २५) मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी साहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलिस उपनिरीक्षक यशवंत यादव, पोलिस हवालदार प्रणयकुमार उकिरडे, संजय नाडेकर, अजित पवार, योगेश रोडे यांचे तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान संशयास्पदरीत्या गोगला डेनियल बिलआप्पा (वय ५६, रा. राजमंगलम, वेल्लीविवेकम, चेन्नई) आढळून आला. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, आरोपीने मंचर, पारगाव साखर कारखाना व वडगाव मावळ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चार गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार फरार असून, दोघांनी महाराष्ट्र व इतर राज्यांतही अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे, असे कंकाळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT