पुणे

बारामती तालुक्यातील ५०० बंधारे तुडुंब

CD

मोरगाव, ता.८ : बारामती तालुक्यातील ५०० पेक्षा अधिक सिमेंट बंधारे मे महिन्यात झालेल्या पावसामुळे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही बाजूच्या अर्धा किलोमीटर अंतरावरील विहिरींतील पाण्याची पातळी वाढली आहे. शेतीच्या सिंचनाचा प्रश्‍न मिटल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद, जलसंधारण विभाग व कृषी विभाग यांच्या बंधारे भरल्याने खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन शंभर टक्के वाढणार आहे, असा विश्‍वास काही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मोरगाव, लोणी भापकर, तरडोली, मासाळवाडी, पळशी, भिलारवाडी, जळगाव या पट्ट्यांमधून कायम पशुपालकांना पशुधन जगवण्यासाठी बागायती भागातून चारा आणावा लागतो. मात्र, निसर्गाच्या कृपेने झालेली पर्जन्यवृष्टी व त्यामुळे भरलेले बंधारे, ओढे तसेच विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा पीक उत्पादन १०० टक्के घेतले आहे.

दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांना ताजा पैसा हाताशी येतो शिवाय त्यातून पूर्ण गरजा भागवून शेतात विविध पिकांचे घेतलेले उत्पादन पूर्णपणे फायद्यात राहते.
दरम्यान, २०१४ पासून बारामती तालुक्यातील जिरायती भागातील आंबी बुद्रुक, जो गवळी, मोढवे, मुर्टी, तरडोली, जळगाव कप, भिलारवाडी, मासाळवाडी, लोणी भापकर, सायंबाची वाडी यासह प्रत्येक टंचाईग्रस्त गावात ओढा खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. खोलीकरण झालेल्या ठिकाणी जिल्हा परिषद व जलसंधारण विभाग यांनी पाणीसाठा होईल अशा पूरक ठिकाणी कमीत कमी पंधरा लाख ते जास्तीत जास्त ६० लाख रुपये निधी खर्च करून सिमेंट बंधाऱ्याची कामे केली आहेत.

मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा शाश्वत आधार झाला आहे. दरवर्षी शासनाने ओढ्यातील व बंधाऱ्यातील गाळ उपसा करण्याची तरतूद उन्हाळ्यात करावी. सध्या जिराईत पट्ट्यात प्रत्येक गावातील बंधाऱ्यात शेतकऱ्यांचे समाधान होईल असा पाणीसाठा आहे.


ओढा खोलीकरणामुळे शाश्वत पाणी
‘‍सकाळ’सह विविध सामाजिक संस्थांनी केलेल्या ओढा खोलीकरणाच्या कामामुळे सिमेंट बंधारे सहजतेने होण्यास मदत झाली. या स्रोतांमधून मिळालेल्या शाश्वत पाण्यामुळे शेतकऱ्यांचे शिवार हिरवेगार आहे. उसाचे पीकही शेतकरी आत्मविश्वासाने घेत आहेत, असे आंबी बुद्रुकचे माजी सरपंच प्रवीण शिर्के, भिलारवाडीचे माजी सरपंच कल्याण चव्हाण, मोरगावचे माजी सरपंच दत्तात्रेय ढोले यांनी सांगितले.


पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम जलसंधारण विभाग राबवत असून ज्या ठिकाणी सिमेंट बंधारे करण्यास पूरक परिस्थिती आहे. त्या ठिकाणी बंधारे केले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र ओलिताखाली आले आहे. यापुढेही गरज असलेल्या ठिकाणी टंचाईग्रस्त भागात निश्चित काम केले जाईल,
- योगेश बांगर, शाखा अभियंता, जलसंधारण विभाग बारामती

02991

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT