पुणे

पार्सली पाल्याच्या यशस्वी प्रयोगामुळे शाश्वत उत्पन्न

CD

विवेक शिंदे : सकाळ वृत्तसेवा
महाळुंगे पडवळ, ता. १ : कळंब (ता.आंबेगाव) येथील शेतकरी वरुण ठमाजी पिंगळे व त्याच्या पत्नी प्रियांका या दाम्पत्याने पार्सली पाल्याची नावीन्यपूर्ण शेती करून शाश्वत उत्पन्न सुरू केले आहे. पाच गुंठे जमिनीत राबविलेला हा प्रयोग यशस्वी झाला. यातून त्यांना दर आठवड्याला सुमारे सहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पार्सली पाल्याचा उपयोग विविध फुलांच्या हारामध्ये तसेच सजावटीसाठी केला जात आहे.

पुणे जिल्हा सुरक्षा मंडळ या संस्थेमार्फत अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरक्षा रक्षक म्हणून वरुण पिंगळे काम करतात. काम करून फुलांचे हार बनविण्याचे दुकान व शेती ते सांभाळतात. त्यांनी पाच गुंठे जमिनीची योग्य प्रकारे मशागत केली. जमिनीत शेणखत मिसळले. सरी काढली. पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरे येथील वेदांत नर्सरीतून पार्सली रोपांचे तीन रुपये प्रती रोप या प्रमाणे तीन हजार रोपांचे बुकिंग केले.

अशी केली लागवड
१. डिसेंबरमध्ये दोन रोपांमध्ये एक फूट अंतर ठेवून लागवड
२. आवश्यकतेनुसार योग्य खतांचा वापर
३. पाण्याचे योग्य नियोजन केले.
४. लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसानंतर खुडणी
५. साधारणपणे दहा दिवसानंतर आला पाला खुडायला

मंचर येथील व अन्य गावातील स्थानिक हार बनविणाऱ्या कारागीरांशी पिंगळे यांनी संपर्क केला आहे. त्यांनी नोंदविलेल्या मागणीनुसार पार्सलीच्या परिपक्व झालेल्या पाल्याची काढणी सुरू केली. झाडाच्या वाढीनुसार उत्पादनात वाढ होत जाते. सरासरी एका झाडाला १५० ते २०० ग्राम उत्पादन मिळत आहे. आठ ते दहा महिने उत्पादन मिळेल.
- प्रियांका पिंगळे


मागणी अधिक असल्याने पुरेशा प्रमाणात पार्सली पाला उपलब्ध होत नाही. यातूनच स्वतःच्या शेतात पार्सलीची लागवड करण्याच्या निर्णय घेतला. खते, औषधे, मजुरी, रोपे असा एकूण १५ ते २० हजार खर्च झाला. सरासरी आठवड्याला ३० ते ३५ किलो उत्पादन मिळू लागले आहे. बाजारभावातील चढ उतारानुसार १५० रुपये ते २०० रुपये प्रती किलो बाजारभाव मिळतो. आठवड्याला सुमारे सहा हजार रुपये शाश्वत उत्पन्न मिळत आहे.
- वरुण पिंगळे, पार्सली पाल्याचे उत्पादक

दृष्टिक्षेपात पार्सली पाला
१. ५० ते ५५ दिवसानंतर रोपाची पाने खुडणीला सुरुवात
२. एका रोपाला १५० ते २०० ग्राम उत्पादन
३. पाल्यास सुमारे २०० रुपये प्रती किलो बाजारभाव
४. आठ ते दहा महिने उत्पादन देण्याची झाडाची क्षमता
५. कमी वेळेत व कमी खर्चात अधिक उत्पादन


01577, 01578, 01580, 01581

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

SCROLL FOR NEXT