
मुंबई : दादर येथील टिळक उड्डाण पुल रोज होणारी वाहतूक कोंडी व आपातकालीन वाहनांना प्रवेश करण्यास येणाऱ्या अडचणीवर उपाय म्हणून (२ ते ३० ऑगस्ट) एक महिना अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. त्यामुळे बी.ए. रोडवरील वाहनाची संख्या वाढणार आहे. टिळकपुलावर ८० हजार ते एक लाख वाहनांची येजा असते.