पुणे

आंबेगाव तालुक्यात काकडा उत्सवाची सांगता

CD

महाळुंगे पडवळ, ता. १९ : आंबेगाव तालुक्यातील कळंब, एकलहरे, वर्पेमळा, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, महाळुंगे पडवळ, साकोरे, चास, चांडोली बुद्रुक लौकी आदी गावांत एक महिन्यापासून सुरू असलेल्या काकड आरती उत्सवाची सांगता नुकतीच झाली. कळंब येथे प्रभातफेरीचे आयोजन करून घोडनदीत दिवे विसर्जित करून सांगता करण्यात आली.
कळंब येथे आदिशक्ती कमलजादेवी माता मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत एक महिनाभर काकड आरती सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. या कालावधीत पहाटे मंगलचरण, अभंग, भूपाळी अभंग, वासुदेव, आंधळा, पांगुळ, गवळण, या शिवाय गणपती, देवीची, विठ्ठलाची आरती नित्यनियमाने होत असे. चैतन्य महाराज कबीर यांच्या सूचनेनुसार सुरेखाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज मंदिरात ३० ते ३५ महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण मुले काकड आरती उत्सवासाठी उपस्थित राहत होते. गेल्या २२ वर्षांपासून काकड आरतीची परंपरा येथील नागरिकांनी जपली आहे. उपस्थित महिलांना दररोज चहाची व्यवस्था लक्ष्मीबाई पवार, महिलांना पहाटे मंदिरापर्यंत ने-आण करण्याची सोय सेवानिवृत्त शिक्षक रामदास शिंदे तर, मंदिराभोवती सारवून रांगोळी काढण्याचे काम सुलोचना कानडे हे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.
याप्रसंगी आदिशक्ती कमलजादेवी मंदिर ते कळंब ग्रामपंचायत चौक या दरम्यान प्रभात फेरी काढण्यात आली. ज्ञानोबा, तुकाराम महाराजांचा गजर करत महिलांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. कळंब येथील घोडनदीच्या तीरावर दीप प्रज्वलन करून नदीपात्रात दिवे विसर्जित केले. यावेळी प्रवचनकार सुरेखा शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्या सविता भालेराव, शिक्षिका सीमा कहडणे, मंगल थोरात, विणेकरी सुमन कानडे, सुलोचना कानडे, अंजना कानडे, पुष्पा भालेराव, माजी सरपंच गंगाधर कानडे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता कानडे, प्रशांत गुरव, गेणभाऊ गारगोटे, महादू भालेराव, पखवाज वादक दत्ता गारगोटे, लक्ष्मी पवार, मंदाकिनी पवार, नितीन पवार, सुनंदा कहडणे,विजया भालेराव, संध्या कानडे, सुमन कहडणे, कल्पना गुरव, ज्ञानेश्वरी कहडणे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT