पुणे

आंबळेतील तरुण राबवतोय ''घर तिथे यंत्र'' संकल्पना

CD

माळशिरस, ता. २३ : आंबळे (ता. पुरंदर) येथे कृषी यांत्रिकीकरण सोहळ्याचे उद्घाटन नुकताच पार पडले. यावेळी तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरचे पूजन करण्यात आले. ''घर तिथे यंत्र'' व ''शेत तिथे सौर पंप'' संकल्पनेअंतर्गत गोविंद शेतकरी सेवा केंद्राचे प्रमुख भूषण जगताप यांनी कृषी विभाग तसेच शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या वसा घेतला आहे. त्यांच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा फायदा होत आहे.
कृषी विभागाच्या मदतीने व गोविंद शेतकरी सेवा केंद्र, वाघापूर चौफुला यांच्या संयुक्त विद्यमाने ''घर तिथे यंत्र'' व ''शेत तिथे सौर पंप'' ही संकल्पना तालुक्यात राबविली जात आहे. या अंतर्गत आंबळे येथील १५ शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मंजूर झाले आहेत. काही शेतकरी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत तर काही शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसले आहेत. सौरपंपामुळे शेतकरी आता वीज नसतानाही शेतीला पाणी देत आहे. काहींना लवकरच ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आहे. जगताप यांच्याकडे नोंदणी केलेल्या सुमारे ११० शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा फायदा होणार आहे.
आंबळे पंचक्रोशीतील राजेवाडी, वाघापूर, गुरोळी, सिंगापूर, पारगाव, टेकवडी गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जगताप पोहचत आहे व त्यांना सरकारी योजनांची माहिती देऊन त्यांना एक आर्थिक फायदा करून देत आहे.
ट्रॅक्टरचे पूजनप्रसंगी करताना मंडल अधिकारी वाघमारे, कृषी सहायक किरण हरपळे, आंबळे गावच्या सरपंच राजश्री थोरात, उपसरपंच मुक्ताकाकी जगताप, गुरूदत्त अॅगो एजन्सीचे विपणन विभागाचे प्रमुख प्रकाश माने, माजी उपसरपंच सचिन दरेकर, अजित दरेकर उपस्थित होते.


केंद्रामार्फत शेतकऱ्यांना मिळालेली मदत
१. महाडीबीटी योजनेत आत्तापर्यंत गावातील ३० शेतकऱ्यांना लाभ
२. तीन शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत अनुदानित ट्रॅक्टर
३. १० शेतकऱ्यांना अवजारांचे ३५ ते ५० हजार अनुदान
४. खाद्य कुट्टी मशिनसाठी १५ ते २० हजारांपर्यंत लाभ
५. शेतकऱ्यांना शेततळे कागदाचे अनुदान मिळवून
६. पिकांवर औषध फवारणीसाठी पंप मिळवून दिले
01195

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT