माळशिरस, ता.२०: माळशिरस येथील मामावाडी वस्तीवरील पाझर तलावाच्या मधला भागातील भराव काही अंशी दबलेला आहे. सांडव्यातून पाणी निघण्याअगोदरच या दबलेल्या ठिकाणावरून पाणी बाहेर पडत आहे. यामुळे तलावास धोका निर्माण झाला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन शुक्रवारी (ता.२१) ग्रामपंचायतीने सांडव्याच्या विरुद्ध बाजूकडील पाणी जेसीबीच्या साह्याने जादा पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था केली. त्यामुळे तलाव फुटण्याचा धोका टळला. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
अनेक वर्षांपूर्वीचा पाझर तलाव असणाऱ्या मामावाडी येथील पाझर तलावाच्या माध्यमातून मामावाडीसह गायकवाड वस्ती, गद्रे वस्ती या भागातील शेतकऱ्यांसाठी हा तलाव अत्यंत वरदान आहे. अनेक वर्षानंतर या तलावात प्रथमताच पूर्ण क्षमतेने भरणे इतपत पाणी आलेले आहे. यामुळे वर्षभरातील पाणी प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये निश्चित आनंदाचे वातावरण आहे. मात्र, त्याचवेळी तलाव भरल्यानंतर ज्यादाचे पाणी सांडव्यातून बाहेर पडण्या अगोदर मधल्या भागामध्ये भराव दबलेला असल्याने त्या ठिकाणची उंची सांडव्यापेक्षा कमी जाणवत आहे. यामुळे आणखी जोराचा पाऊस झाल्यास सांडव्यातून पाणी निघण्याऐवजी मधल्या भागातून पाणी भरवावरून खाली पडून भरावाला धोका होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हा संभाव्य धोका विचारात घेऊन सरपंच आरती यादव, माजी सरपंच सदाशिव डोंबाळे, माऊली यादव, भाऊसाहेब यादव यांनी पंचायत समितीच्या लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना समक्ष बोलून पाहणी करून घेतली. त्यानंतर सांडवा जेसीबीच्या साह्याने उकरून खोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सांडव्याच्या भागात कठीण खडक असल्याने त्या ठिकाणाहून पाणी बाहेर काढण्यासाठी आवश्यक खोदाई होत नसल्याने भरावाच्या दुसऱ्या बाजूने खोदकाम करून पर्यायी सांडवा तयार करून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली.
मामावाडी तलावाची दुरुस्ती लघुपाटबंधारे विभागाने करून भरावाची उंची व मजबुतीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी या विभागाकडे ग्रामपंचायती व ग्रामस्थांच्या मागणीनुसार मागणी केली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असल्याने लवकरच या तलावाचे मजबुतीकरण केले जाईल.
- आरती यादव, सरपंच, माळशिरस
मामावाडी तलाव भरल्याने या भागातील पाणी प्रश्न वर्षभराचा मिटलेला आहे.आणखीन परत जोराचा पाऊस झाल्यानंतर पाणी सांडव्यावाटे बाहेर निघण्याची व्यवस्था होणे गरजेचे होते. ते काम झाल्याने भविष्यातील तलावाचा धोका तात्पुरता ठरला. असून उन्हाळ्यात मात्र तलावाच्या भरावयाचे मजबुतीकरण करून उंची वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.
- सदाशिव डोंबाळे, माजी अध्यक्ष, लाभार्थी शेतकरी व विकास सोसायटी
02447
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.