महुडे, ता.२६ : अंगसुळे (ता. भोर) येथील विजय मारुती शेडगे (वय २४) या तरुणाचा ताडी पिऊन शुक्रवारी (ता.२५) मृत्यू झाला. या घटनेच्या विरोधात गावातील महिला आक्रमक झाल्या व त्यांनी दारू व ताडी बंदच्या घोषणा देत अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांची दुकाने फोडली. बनावट ताडीची केंद्र व दारूच्या बाटल्या फोडल्या. पोलिसांना वारंवार अर्ज करूनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने गावातील ताडी व दारू विक्री बंद केली नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
यावेळी गावातील सुषमा राऊत, वंदना राऊत, नंदा शेडगे, रंजना राऊत, सुभद्रा राऊत, वैशाली राऊत, संजना दळवी, कुंदा राऊत, मंगल राऊत, सुमन राऊत, शांताबाई राऊत, सुमन राऊत, सुषमा तावरे, सोपान राऊत, धोंडिबा राऊत,आनंद राऊत, शिवाजी कंक, यशवंत कंक, बबन भगत, विठ्ठल सणस, अक्षय झुनगारे, भाऊसाहेब परखांदे, शशिकांत किरवे, रामचंद्र राऊत यासह गावातील तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अंगसुळे येथे मागील ५० वर्षांपासून ताडी विक्री सुरू आहे. आतापर्यंत सांगवीसह अंगसुळे गावातील चारजण मृत्यूमुखी पडले आहेत. कारी, अंगसुळे, सांगवी, कंकवाडी व भावेखल येथील तरुण येथे येतात व बनावट ताडी पिऊन तरुण वसनाधीन होत असून, घरात भांडणतंटे वाढत आहेत.
दरम्यान, आमदार शंकर मांडेकर यांनी आढावा बैठकीत अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना देऊनही अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून, तरुणांचा जीव जात असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.
अंगसुळे येथे परवानगी नसतानाही ताडी विक्री केली जात आहे तर अवैद्य विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री होते. याकडे उत्पादन शुल्क विभाग व भोर पोलिस काणाडोळा करत आहेत. अंगसुळे येथील अवैध धंद्यामुळे कारी, सांगवी भिडे, भावेखल, अंगसुळे गावातील नागरिकांनी अवैद्य ताडी विकली जात व अवैद्य दारू केली जात आहे. तसेच आंबवडे खोऱ्यातील व वाई तालुक्यातील तळीराम येथून ताडी नेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
भोर तालुक्यात अंगसुळे, नांदगाव, निगुडघर, वाकांबे येथे मोठ्या प्रमाणात ताडी व बनावट दारू विक्री सुरू आहे. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभाग व भोर पोलिस दुर्लक्ष करत आहेत. यामुळे अवैद्य धंद्यात दिवसेंदिवस वाढ होत असून याचा मोठा परीणाम होय असून हे धंदे बंद झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावातील महिलांनी दिला आहे.
01771, 01772
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.