पुणे

भोरमधील ८० गावांना मॉन्सूनचा फटका

CD

भोर, ता.१५ : भोर तालुक्यात मे महिन्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे ८० गावातील ४९९ शेतकऱ्यांच्या उन्हाळी बागायती पिकांचे सुमारे १३०.६८ हेक्टर क्षेत्रावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती भोर तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी दिली.

भोर तालुक्यात ७ मे ते २९ मेपर्यंत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात सर्वाधिक काढणीस आलेल्या भुईमूग पिकासह सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या पिकातून वर्षभरासाठी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान्य, तेल व जनावरांच्या खाद्याला मोठा बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणित कोलमडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे त्वरित भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जिरायती
४६............ गावे
३५२............शेतकरी

पिकांचे नुकसान (हेक्टररमध्ये)
भुईमूग – ५७. ८४ हेक्टर
सोयाबीन – २०.७३ हेक्टर
बाजरी – ९.०५ हेक्टर
ज्वारी – १.९७ हेक्टर
भात ०.२० गुंठे
इतर – ३.२० हेक्टर
एकूण - ९२.९९ हेक्टर


बागायती
२३.............. गावे
१०९.............शेतकरी

पिकांचे नुकसान (हेक्टररमध्ये)
भाजीपाला – २४.०७ हेक्टर
फुले – ०.१५ हेक्टर
एकूण - २४.२२ हेक्टर

फळबाग*
११............. गावे
३८........शेतकरी
आंबा............. १३.४७ हेक्टर

भोर तालुक्यात नेमणूक केलेल्या महसूल, कृषी व ग्रामविकास अधिकारी यांनी शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे केले आहेत. त्याचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
- राजेंद्र नजन, तहसीलदार, भोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला स्वत:चाच विक्रम; स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केले तब्बल १०३ मिनिटे भाषण

Latest Marathi News Live Updates : जयकुमार गोरे यांच्या हस्तेजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला ध्वजारोहन सोहळा

Janmashtami Decoration Ideas: जन्माष्टमी निमित्त मंदिर सजवायचंय? या सोप्या आणि सुंदर आयडिया नक्की ट्राय करा!

Independence Day 2025 : महाराष्ट्र कारागृह विभागातील आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा? फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

SCROLL FOR NEXT