
Summary
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी लाल किल्ल्यावरून १०३ मिनिटांचे भाषण देऊन इतिहासातील सर्वात लांब स्वातंत्र्यदिनी भाषणाचा विक्रम प्रस्थापित केला.
मोदींनी स्वतःचाच २०२४ मधील ९८ मिनिटांच्या भाषणाचा विक्रम मोडला, तसेच सलग १२ भाषणांद्वारे इंदिरा गांधींचा विक्रमही मागे टाकला.
यापूर्वीच्या पंतप्रधानांच्या भाषणांच्या तुलनेत मोदींची भाषणे कालावधीच्या दृष्टीने नेहमीच जास्त लांब राहिली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्यदिनी १०३ मिनिटांचे भाषण करत स्वत:चाच विक्रम मोडला आहे. गेल्या वर्षीच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनी मोदींनी ९८ मिनिटांचे भाषण केले होते. मोदींनी ७९ व्या स्वातंत्र्य दिनी केलेले भाषण हे भारताच्या इतिहासातील कोणत्याही पंतप्रधानाने केलेले सर्वात मोठे भाषण आहे. मोदींनी २०१६ मध्ये स्वातंत्र्य दिनी ९६ मिनिटे भाषण केले तर होते तर २०१७ मध्ये त्यांचे सर्वात लहान भाषण ५६ मिनिटांचे होते.