पुणे

कुंबळेचे ग्रामपंचायत अधिकारी अभिषेक बोत्रे यांचे निलंबन

CD

महुडे, ता. २८ : कुंबळे (ता. भोर) येथील ग्रामपंचायत अधिकारी अभिषेक बोत्रे यांना भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी सोमवारी (ता.२८) जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्याचा आदेश दिला.
ग्रामपंचायत कार्यालय कुंबळे येथे सोमवारी (ता.२८) मद्यपान करून महिला सरपंच व ग्रामस्थांशी असभ्य वर्तन केल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी बोत्रे यांना निलंबन काळात अन्य कोठेही नोकरी अगर व्यवसाय करता येणार नाही, तसे केल्याचे निदर्शनास आल्यास ते त्यांचे कृत्य गैरशिस्तीचे समजण्यात येईल व सदर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात येईल. तसेच कोणत्याही अटीचा भंग केल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल व त्यांना देण्यात येणारा निर्वाहभत्ता मिळण्यास ते पात्र राहणार नाहीत, असेही आदेश गटविकास धनवाडे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: गौतम गंभीर इंग्लिश ग्राऊंड स्टाफसोबत कचाकच भांडला अन् बोट दाखवत...; नेमकं काय घडलं? पाहा Video

MP Congress MLA Agitation : म्हशीच्या वेषात आले कॉंग्रेस आमदार, सहकाऱ्यांनी वाजवली पुंगी; अनोख्या आंदोलनाची होतेय चर्चा

Nashik News : नाशिकमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे बसणार; मनपाची तयारी सुरू

ENG vs IND: 'आरामखुर्चीत बसून मॅच पाहताना...' स्टोक्सवर टीका करणाऱ्यांना पीटरसनने सुनावलं; वाचा काय म्हणाला

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’साठी चिंचोलीत पूजन करून जमीन मोजणी; शेतकऱ्यांचा मिळाला सकारात्मक प्रतिसाद

SCROLL FOR NEXT