पुणे

सैनिकांना जेवण देण्याच्या बहाण्याने फसवणूक

CD

नारायणगाव, ता.२८ : भारतीय सैन्यदलाचे नाव सांगून २५ सैनिकांच्या जेवणाचा एक महिन्याचा करार करण्याचा बहाणा करून, नारायणगाव (ता.जुन्नर) येथील केटरिंग व्यावसायिकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला.

नारायणगाव येथे किशोर शिवाजी दरेकर यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांना रविवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलद्वारे संपर्क साधला.''आम्ही सैन्यदलाचे (आर्मी) सैनिक असून, सिक्रेट मिशनवर काम करत आहोत. तुमच्या भागात आम्ही २५ सैनिक एक महिन्यासाठी वास्तव्यास आलो आहे. आम्हाला एक महिना दररोज २५ ताटे जेवण पाहिजे. जेवण तयार झाल्यानंतर आमची गाडी डबे घेण्यासाठी येईल. दररोजचे पैसे रोख अथवा गुगल पेद्वारे तुम्हाला दिले जातील.'' असे सांगितले. यावेळी संभाषणात जेवणाचा मेनू ठरला. दरेकर यांनी त्यांना अडीचशे रुपये डबा याप्रमाणे दर सांगितला. त्यावेळी त्यांनी दोनशे रुपयेप्रमाणे ताट देण्याचा आग्रह धरला. देशसेवा करणारे सैनिक असल्यामुळे दरेकर यांनी होकार कळवला.
दरम्यान, दरेकर यांनी जेवण तयार केले. सकाळी आठ वाजता त्यांना ''अज्ञात व्यक्तीने जेवण तयार झाले आहे का? गाडी पाठवू का?'' असे विचारले. दरेकर यांनी जेवण तयार झाल्याचे सांगितले. समोरच्या व्यक्तीने, ''तुमचा मोबाईल सुरू राहू द्या. तुम्हाला गुगलद्वारे पैसे पाठवतो,'' असे सांगितले. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने ''तुमच्या खात्यावर दहा हजार रुपये शिल्लक असतील तरच आम्हाला पैसे पाठवता येतील'' असे सांगितले. त्यावर ''माझ्या खात्यावर बाराशे रुपये शिल्लक आहेत'' असे दरेकर यांनी सांगितले. ''तुमच्या मित्राकडून दहा हजार रुपये जमा करून ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला लगेच पैसे पाठवतो.'' दरेकर यांना संशय आल्याने त्यांनी मोबाईल बंद केला. त्यानंतर त्यांनी सैनिक असलेल्या मित्राशी संपर्क साधून सर्व हकिगत सांगितली. सैनिक मित्राने त्यांना ही फसवेगिरी आहे, असे सांगितल्याने दरेकर यांची आर्थिक फसवणूक टळली. मात्र, त्यांना जेवण तयार करण्यासाठी झालेला पाच हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

विधान परिषदेच्या तिकिटासाठी भाजप नेत्यांनी मांडले मुंबईत ठाण

Latest Marathi News Live Update : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना 140 हुन अधिक तरुणींना गंडवणाऱ्या भामट्याला अटक

विद्यार्थीनीनं रिचेकिंगला पाठवलं, उत्तरपत्रिका हातात येताच बसला धक्का; पहिलं पानं सोडून बाकीचं लिहिलं कुणी? CBSEचा सावळा गोंधळ

SCROLL FOR NEXT