पुणे

‘विकसित कृषी संकल्प’मुळे शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव

CD

नारायणगाव, ता. १४ : ‘‘विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव झाली आहे. या कृषी विषयक समस्यांची उकल करण्यासाठी व शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळावा. या दृष्टीने शेतकरीभिमुख संशोधनासाठी देशातील कृषी शास्त्रज्ञांनी संशोधनाची पुढील दिशा ठरवावी,’’ असे मत कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी व्यक्त केले.

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कृषी विज्ञान केंद्रात विकसित कृषी संकल्प अभियानाच्या सांगता समारंभाप्रसंगी मेहेर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर महत्वाचा ठरत आहे. त्यादृष्टीने देखील संशोधनाची पावले पडली पाहिजेत.
केंद्रीय कृषी आणि किसान कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या संकल्पनेतून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनाखाली २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशात विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात आले. संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर ही या अभियानाची मूळ संकल्पना होती. केंद्रीय कृषिमंत्री चौहान, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी २ जूनला येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता.


नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ प्रशांत शेटे म्हणाले की, अभियानात पुणे येथील द्राक्ष संशोधन संस्था, कांदा लसूण संशोधन केंद्र, पुष्प संशोधन केंद्र, भारतीय कृषी संशोधन संस्था, अटारी पुणे,म.फु.कृ.वि विभागीय संशोधन केंद्र, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या शास्त्रज्ञांनी उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, शिरूर तालुक्यातील ९३ गावात ९७ शेतकरी मेळावे घेतले. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

यावेळी अभियानात सहभागी झालेले कृषी शास्त्रज्ञ डॉ.अनुराधा उपाध्याय, डॉ.अश्विनी बेनके, डॉ. प्रांजली गेडाम, डॉ.स्वाती सहा, डॉ.कल्याणी, डॉ. कविता, डॉ.गणेश बनसोडे, डॉ.रवींद्र पवार, डॉ. सौम्या, डॉ.जयलक्ष्मी, डॉ. दत्तात्रेय गावडे, योगेश यादव, निवेदिता शेटे, भारत टेमकर, धनेश पडवळ उपस्थित होते. विषयतज्ज्ञ राहुल घाडगे यांनी या अभियानाचे नियोजन केले.
06707

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

'सैराट' साठी तानाजी गळगुंडेला लाख नाही तर काही हजारांमध्ये मिळालेले पैसे; सगळे मित्राच्या हातात ठेवले कारण...

Latest Marathi News Live Updates: २३ व्या मजल्यावरून उडी मारून दिला जीव

ED Raid on Congress MLA : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या ठिकाणांवर 'ED'चे छापे; कोट्यवधींचे सोने अन् रोकड जप्त

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटांवर गांधी नव्हे, नेताजींचा फोटो! आरबीआयच्या आधीची बँक कोणती? वाचा नेताजींच्या चलनाची अज्ञात कहाणी

SCROLL FOR NEXT