पुणे

टोमॅटोच्या २१ हजार क्रेटची उच्चांकी आवक

CD

नारायणगाव, ता.२३ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो बाजारात सोमवारी (ता.२३) उच्चांकी २१ हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतीची टोमॅटो पाच रुपये ते पंधरा रुपये प्रतिकिलो (२० किलोग्रॅम क्रेटाचा भाव प्रतवारी नुसार १०० रुपये ते ३०० रुपये) या बाजारभावाने खरेदी केली.
टोमॅटोला बाजारभाव नसल्याने दुय्यम दर्जाची टोमॅटो खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. यामुळे दुय्यम दर्जाची टोमॅटो शेतकऱ्यांना टाकून द्यावी लागत आहे. टाकून दिलेली टोमॅटो जुन्नर तालुक्यात स्थायिक असलेले राजस्थान येथील गोपालक जनावरांना खाद्य म्हणून वापरत आहेत. गोपालक दररोज सुमारे पाच ते सात टन दुय्यम दर्जाची टोमॅटो येथील उपबाजारातून मोफत घेऊन जात आहेत.

मागील वर्षी जून ते जुलै दरम्यान टोमॅटो क्रेटला (२० किलोग्रॅम) पाचशे रुपये ते एक हजार रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळाला होता. दुय्यम दर्जाच्या लहान आकाराच्या गुलटी टोमॅटो क्रेटला दोनशे ते तीनशे रुपये बाजारभाव मिळाला होता. यामुळे यावर्षी जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जानेवारी ते मे दरम्यान दोन टप्प्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली होती. यावर्षी मागील पाच ते सहा महिन्यापासून टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झालेली नाही.


५० टक्के फळे टाकून द्यायची वेळ
दीड महिन्यापासून ढगाळ वातावरण असून, सतत पाऊस पडत आहे. यामुळे टोमॅटोला विविध जिवाणूजन्य, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. टोमॅटोचे फळे खराब झाल्याने तोडणीनंतर ४० ते ५० टक्के फळे टाकून द्यावी लागत आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणी सापडलेला आहे.

पावसामुळेही टोमॅटोचे मोठे नुकसान
खरेदी केलेली चांगल्या प्रतीची टोमॅटो पुणे, मुंबई व मध्य प्रदेश, गुजरात या ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जात आहे. यावर्षी इतर राज्यातून टोमॅटोला मागणी नाही. यामुळे मागील सहा महिन्यापासून टोमॅटोला समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही. यावर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. पावसामुळेही टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे व्यापारी योगेश घोलप, जालिंदर थोरवे यांनी सांगितले.


मागील पाच वर्षातील वर्षनिहाय झालेली टोमॅटो क्रेटची आवक,
(मिळालेला सरासरी बाजारभाव, एकूण आर्थिक उलाढाल अनुक्रमे )
वर्ष......................आवक (क्रेट).....................................सरासरी बाजारभाव (रु.) .......... एकूण उलाढाल ( कोटी रुपयांत)
एप्रिल २०२० ते मार्च २०२१.....................३५ लाख ३५ हजार ७७५..................... १००ते ६५० ..................... १०६
एप्रिल २०२१ ते मार्च २०२२.....................४० लाख ५५ हजार २७७ .....................१००ते ७००.....................६०
एप्रिल २०२२ ते मार्च २०२३.....................२७ लाख ७ हजार ३०८ .....................१०० ते ९००.....................८७
मार्च २०२३ ते एप्रिल २०२४.....................३० लाख १९ हजार २४०.....................१०० ते ३१०० .....................१४३
मार्च २०२४ ते एप्रिल २०२५ .....................३१ लाख १३ हजार ८८०.....................५० ते १२००.....................१६१
३१ मे २०२५ अखेर.....................५ लाख ८० हजार ४६५ .....................५० रु. ते ५५० .....................१५

06761

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid on Congress MLA : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या ठिकाणांवर 'ED'चे छापे; कोट्यवधींचे सोने अन् रोकड जप्त

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटांवर गांधी नव्हे, नेताजींचा फोटो! आरबीआयच्या आधीची बँक कोणती? वाचा नेताजींच्या चलनाची अज्ञात कहाणी

Latest Marathi News Live Updates : छत्रपती संभाजी नगर तालुक्यात ढगफुटी

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

SCROLL FOR NEXT