पुणे

मंदिर, प्रार्थनास्थळाच्या सुरक्षेच्या सूचना

CD

नसरापूर, ता.२६ : राजगड पोलिस ठाण्याच्या वतीने हद्दीतील सर्व मंदिरे, मस्जिद, दर्गा व चर्च तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पुतळ्यांच्या सुरक्षेबाबत तेथील व्यवस्थापन व ग्रामस्थांना सूचना केल्या आहेत. कोणत्याही प्रकारे विटंबना किंवा पवित्रस्थळाचा अपमान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकासह व्यवस्था करावी, असे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.

राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील मंदिरात नुकतीच मूर्तीची विटंबना केली होती. त्याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मंदिर, मस्जिद, दर्गे व चर्चच्या व्यवस्थापकांना स्थानिक पोलिस पाटील यांच्यामार्फत पत्र देण्यात आले आहे. या पत्रामध्ये मंदिर व इतर प्रार्थनास्थळाच्या देखभाली करता कायमस्वरूपी चोवीसतास एक व्यक्तीची नेमणूक करून सदर ठिकाणची व्यवस्था ठेवण्यात यावी. तसेच मंदिर मस्जिद व पुतळा परिसरात योग्य प्रकाशाची व्यवस्था करावी, परिसरात चांगल्या प्रतिचे सीसीसी टिव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. परिसराला लोखंडी कंपाउंड करावे, देखभालीसाठी एका व्यक्ती कायम तिथे राहील याची काळजी घ्यावी, विटंबना होणार नाही याबाबत सर्व ती व्यवस्था करण्यात यावी असे पत्राव्दारे दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

राजगडच्या हद्दीतील समाजकंटकांनी काही उपद्रव केल्यास समाजातील सौदार्ह्याचे वातावरण बिघडून शांतता व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हद्दीतील प्रत्येक मंदिर मस्जिद,चर्च व पुतळे असलेल्या ग्रामस्थांना किंवा तेथील व्यवस्थापनांना तेथील सुरक्षेबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. पोलिस कर्मचारी देखिल रात्रीची गस्त घालताना अशा ठिकाणी भेट देणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सचिन पाटील, पोलिस निरीक्षक, राजगड पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT