पुणे

परदेशातील खवय्यांनाही ‘ओंकार’ची गोडी

CD

न्हावरे, ता.२२ : ओंकार शुगर ग्रुपकडून उच्च दर्जाची दर्जेदार व गुणवत्तापूर्ण साखर निर्मिती होत असल्यामुळे या साखरेची आता परदेशातील खवय्यांना, ग्राहकांना व व्यावसायिक यांना गोडी लागली आहे. त्याचाच परिपाक म्हणून व भारत-थायलंड व्यापार वाढविण्यासाठी थायलंड (बँकांक) येथील आरडब्ल्यू ग्लोबलने ओंकार शुगर ग्रुप (पुणे) यांच्याबरोबर ५० हजार टन साखरपुरवठा करारावर स्वाक्षरी झाली आहे.
पुणे येथे नुकताच हा करार झाला. यावेळी ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील व आरडब्ल्यू कंपनीचे व्यवस्थापक राज वासनिक, ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे पाटील, रेखा बोत्रे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
बोत्रे पाटील यांनी महाराष्ट्रात मागील आठ-दहा वर्षांपासून महाराष्ट्रात बंद पडलेले १७ साखर कारखाने सुरू करून संस्था, ऊस उत्पादक, कामगार, पुरवठादार व ऊस तोडणी वाहतूकदार यांच्यासाठी पारदर्शक काम करीत आहेत. ओंकार शुगर ग्रुपच्या माध्यमातून १५ हजार ७६० कामगार, दोन लाख ७७० वाहतूकदार व आठ लाख शेतकरी जोडण्यात आला आहे. या अगोदरही ओंकार शुगर ग्रुपचा इथेनॉलचा आंतरराष्ट्रीय कंपन्याबरोबर करार झाला आहे तर आता साखर निर्यातीचा करार झाल्यामुळे साखर उद्योगात ओंकार शुगर ग्रुपचे मोठे यश समजले जाते.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय साखरेच्या कराराचे सर्व श्रेय ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहनमालक, सर्व कारखान्यांचे व्यवस्थापक आहे. त्यांच्यामुळे ओंकार शुगर ग्रुपने आंतरराष्ट्रीय भरारी मारली असल्याचे प्रतिपादन बोत्रे पाटील यांनी बोलताना सांगितले.

02431

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT