पुणे

ऊस लागवडीसह पिकांच्या पेरण्या खोळंबल्या

CD

नीरा नरसिंहपूर, ता.२७ : इंदापूर तालुक्यात बावडा, नरसिंहपूर पावसाने दीड महिन्यापासून ओढ दिली आहे. उसाच्या लागवडीसह पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच शेतीची इतर कामे ठप्प झाली आहे. यामुळे गावोगावच्या मजुरांच्या हाताला कामे नसल्याने बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तरकारी पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने तरकारी महागली आहे. तसेच चारा पिकांच्या संभाव्य उपलब्धतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असल्याने दुग्धव्यवसाय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. औषधे, बि-बियाणांच्या दुकानात माल भरून शेतकऱ्यांची वाट पाहण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे.
बावडा, नरसिंहपूर परिसरात पावसाने दांडी मारली आहे. उजनी धरण क्षेत्रात व परिसरात समाधानकारक पाऊस झाला असून, धरणातील पाणी साठा हळूहळू शंभरीकडे वाटचाल करीत आहे. उजनी धरणाने प्रथमताच जुलै महिन्यात शंभरी गाठल्याने भीमा नदीवरील माढा व इंदापूर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाणी योजनांचा प्रश्न निकाली निघाला आहे.

शेतातील कामे ठप्प झाल्याने शेतमजुरांच्या हाताला कामे नसल्याने मोठी आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे बाजारपेठेत माल आहे परंतु खरेदीसाठी पैसा नसल्याने कोणी फिरकायला तयार नसल्याने बाजारपेठा ग्राहकांन अभावी ओस पडल्या आहेत.

शेती मोकळी ठेवण्याची वेळ
शेतकऱ्यांनी पावसाच्या जिवावर उसाची लागवड करण्यासाठी शेत नांगरून, खांदून, ओढून, सऱ्या सोडून ठेवल्या आहेत. पाऊस पडल्याबरोबर ऊस बेणे आणून लागण दाबायची एवढेच काम शिल्लक ठेवले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेती मोकळी ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जर का अशीच परिस्थिती राहीली तर मात्र दुष्काळ पडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बाजारपेठ पडली थंड
पावसाने ओढ दिली असल्याने शेतकरी, शेतमजूर, दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन, व्यापारी, नागरिक, चिकन व मटण दुकानदार हातघाईवर आला आहे. बाजारपेठच थंड पडल्याने पैसा फिरायला तयार नाही. त्यातच नीरा व भीमा नद्यांना पाणी असूनही मोटारी बाहेर काढून ठेवल्याने पिकांना पाणीही देता येईना व पाऊसही पडेना त्यामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनःस्थिती झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Congress MLA Agitation : म्हशीच्या वेषात आले कॉंग्रेस आमदार, सहकाऱ्यांनी वाजवली पुंगी; अनोख्या आंदोलनाची होतेय चर्चा

Nashik News : नाशिकमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे बसणार; मनपाची तयारी सुरू

ENG vs IND: 'आरामखुर्चीत बसून मॅच पाहताना...' स्टोक्सवर टीका करणाऱ्यांना पीटरसनने सुनावलं; वाचा काय म्हणाला

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’साठी चिंचोलीत पूजन करून जमीन मोजणी; शेतकऱ्यांचा मिळाला सकारात्मक प्रतिसाद

Koyna Dam: कोयना धरणाचे दरवाजे चार फुटांवर; पावसाचा जोर मंदावला, नदीपात्रात २१ हजार ८२४ क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT