ओतूर, ता. २६ : ओतूर (ता. जुन्नर) येथे अक्षय तृतीयाला (३० एप्रिल) देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सांगता सोहळ्याचे धर्म ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माउली) यांनी दिली.
ओतूर येथील त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सांगता सोहळ्याची नियोजन बैठक छोटे माउली आणि तुळशीराम महाराज सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. यावेळी ओतूर गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय, धार्मिक, व्यावसायिक, शैक्षणिक, तसेच इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सदर सोहळ्यानिमित्त १७ मे २०२५ रोजी ओतूर येथे होणाऱ्या भव्यदिव्य मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले. कमिट्या स्थापन करून अनेकांना जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. तसेच, संपूर्ण त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने होणार असलेल्या विविध उपक्रमांबाबत नियोजन केले. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध प्रमुख संस्थानिकांची कीर्तनसेवा, तुकाराम महाराजांची सुश्राव्य कथा, संगीत गाथा पारायण, २४ तास ‘राम कृष्ण हरि’ मंत्राचा जप, अखंड हरिनाम सप्ताह, आरोग्य शिबिर, कृषी प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन व विक्री, आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.