पुणे

धुरनळी धबधब्याजवळील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

CD

ओतूर, ता. २० : येथून जवळच असलेल्या धुरनळी धबधब्यावर वर्षा विहारासाठी आलेल्या तरुण पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी दिली. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजेदरम्यान धबधब्याजवळील तलावात हा पर्यटक पडल्याने घडली.
जहीर अल्ली सराज अन्सारी (वय २१, नारायणगाव, ता. जुन्नर, मूळगाव पडरौना, ता. सिंगापट्टी, जि. कुसीनगर, राज्य उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत ओतूर पोलिसात मकबुल मनोहर मनसरी यांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितल्यानुसार नारायणगाव येथून मकबूल मनसरी, जहीर अल्ली व इतर दोघे दुचाकीवर धुरनळी धबधब्यावर गेले आणि तेथे धबधब्याखाली भिजताना वर्षाविहाराचा आनंद घेतला. त्यानंतर जहीर अल्ली हा लघुशंकेसाठी गेला आणि तेथील पाण्यात पडून बुडाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा पाण्यात शोध घेऊन त्यास बाहेर काढून ओतूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAIB Investigation: विमान आपघातांचा तपास होतो कसा?

दोनदा सहन केलं घटस्फोटाचं दुःख, आता कृष्णभक्तीत सगळं विसरली मराठी अभिनेत्री; वृंदावनात झाली शिफ्ट, म्हणते, मला करमत नाही...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मंत्री कोकाटे आणि सूरज चव्हाण यांच्याविरोधात पोस्टर लावून निषेध

रोहित किंवा विराटशी नव्हे, तर शुभमन गिलची तुलना 'या' तीन दिग्गजांशी व्हायला हवी; सुनील गावस्करांचे स्पष्ट मत

Mutual Funds: गेल्या 3 वर्षात कोणत्या म्युच्युअल फंडांनी दिला 36 टक्के परतावा? पाहा यादी

SCROLL FOR NEXT