पुणे

पाबळच्या यात्रेत सोनसाखळ्यांची चोरी

CD

पाबळ, ता. २ : येथील भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. चोरट्यांनी या गर्दीचा गैरफायदा घेत भरदिवसा दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवल्याची घटना शनिवारी (ता. ३१) घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पाबळ येथील भैरवनाथ देवाची यात्रा असल्याने परिसरातील तसेच आजूबाजूच्या गावांतील नागरिक यात्रेसाठी दाखल झाले होते. यात्रेत मुखई (ता. शिरूर) येथील रेश्मा आगळे व पाबळ येथील कल्पना बगाटे या महिलांच्या गळ्यातील प्रत्येकी अर्धा तोळे वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी रेश्मा महादेव आगळे (वय ३८, रा. मुखई, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी' वितरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे आदेश; कोणाला किती गॅस मिळणार? यादी आली समोर

Ancestors Findings : आजोबा-पणजोबा-खापर पणजोबा-लकडपणजोबा-परपणजोबा...घरबसल्या वंशावळ कशी शोधायची? वाचा एकदम सोपी पद्धत

"मी त्याला अभिनय शिकवलाय..." क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने केलं अक्षय खन्नाचं कौतुक ; "कोणत्याही भूमिकेत.."

Gas Cylinder Shortage : बारामतीत सोमवारपासून सिलिंडरअभावी परिस्थिती गंभीर होण्याची भीती....

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

SCROLL FOR NEXT