पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने तालुक्याचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतील. त्यांच्या आजवरच्या जीवनामध्ये अनेक खाचखळगे त्यांनी पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत. सद्या आमदार नसताना देखील त्यांच्या घरी दररोज समस्या घेऊन येणाऱ्या लोकांची रीघ लागलेली असते. लोकांचे प्रश्न सोडवणे हा त्यांचा पहिल्यापासून व्यासंग आहे.
दिलीप अण्णा यांनी खेड तालुक्याचे तीन वेळेला आमदार म्हणून नेतृत्व केले आहे. येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलेले आहे. जय -पराजयाने कधीही ते खचून गेले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम कायम केलेले आहे.
खेड तालुक्याच्या इतिहासामध्ये विकास कामांच्या माध्यमातून जनतेने त्यांना ‘कार्यसम्राट’ ही पदवी दिली आहे. खेडमध्ये सर्वांगीण विकास करताना दूरदृष्टी ठेवून त्यांनी तालुक्याच्या सर्व भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून तालुक्यामध्ये पाझर तलाव, के.टी.बंधारे धरणांतर्गत देणे, शेंदुर्ली, पाभे पुलकम बंधारा, धरण क्षेत्रातील वाळद सुरकुंडीचा सर्वात मोठा पूल, खिंड फोडून रस्त्यांच्या द्वारे भामनेर व भीमनेर खोरे जोडण्याचे काम केले. गावोगावी सभामंडप, काँक्रिट रोड, स्मशानभूमी शेड, शाळा, अंगणवाडी इमारती, जलजीवन मिशन अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या हुतात्मा राजगुरूंच्या स्मारक व वाफगाव येथील अहिल्याबाई होळकर वाड्यासाठी भरघोस निधी आणून सद्या दोन्ही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे.
राजगुरू क्रीडा संकुलासाठी भरघोस निधी
खेड पंचायत समितीच्या इमारतीच्या जागेवर प्रशासकीय इमारतीचे काम मंजूर करून तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय एकत्र आणण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुलासाठी आजवर भरघोस निधी आणलाच आणि आता त्याचठिकाणी स्वीमिंग पुलासाठी कोट्यवधीचा निधी आणला आहे.राजगुरुनगर शहरांमध्ये एसटी स्थानकाकडून गावाला जोडणारा ओढ्यावर पूल बांधून तसेच हुतात्मा राजगुरू स्मारक ते चांडोली पूल बांधून वाहतूक कोंडी कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
एस.टी स्टँड ते वाडा रोड संपूर्ण काँक्रिटीकरण करून प्रशस्त रस्ता राजगुरूकरासाठी उपलब्ध करून दिला.
तीर्थक्षेत्रांचा विकास केला
आरोग्याच्या सुविधा देत असताना चाकण येथे ग्रामीण रुग्णालयासाठी निधी आणून सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल निर्माण करण्याचे काम केले आहे. तीर्थक्षेत्रांतर्गत श्रीक्षेत्र आळंदी, निमगाव, खरपुडी व इतर ठिकाणी निधी आणून तीर्थक्षेत्रांचा विकास केला आहे. हे सर्व करत असताना विधानसभेमध्ये जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रभावी काम केले आहे त्यामुळे त्यांना ‘उत्कृष्ट वक्तृत्व’ पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे .
सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका
राजगुरुनगर शहरामध्ये न्यायालयाच्या दोन भव्य इमारती, पोलिस ठाण्याची नवीन इमारत, तालुक्याच्या सर्व भागांमध्ये रस्ते, पूल बांधून दळणवळणाचे मार्ग निर्माण करण्याचे काम केले आहे. तालुक्यातील जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटून त्यांना न्याय देण्याची भूमिका अण्णांची असते.
पराभवामुळे खचून न जाता
ताकदीनिशी जिंकण्याचा निर्धार
पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने अण्णा कामाला लागले आहेत.मनामध्ये असणारा प्रचंड आत्मविश्वास, कार्यकर्त्यांची असणारी मोठी फौज या ताकदीवर पुन्हा एकदा तालुक्यामध्ये राजकीय गरुड झेप घेऊन येणाऱ्या सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी जिंकण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. एक महत्त्वाकांक्षी नेता म्हणून राज्यामध्ये त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे कोणत्याही पराभवामुळे खचून न जाता नव्या उमेदीने कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे नवी झेप घेऊन तालुक्याचा विकास करण्यास ते कटिबद्ध आहेत.
आई जगदंबा त्यांना पुन्हा एकदा आमदारपदी विराजमान करो,त्यांना उत्तम आरोग्य लाभो व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे बळ त्यांना मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !
शब्दांकन : अरुण सीताराम चांभारे (माजी जिल्हा परिषद सदस्य तथा संचालक पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.