पुणे

महसूल अधिकऱ्यांकडून पेसा कायद्याचे उल्लंघन

CD

फुलवडे, ता. १३ : जुन्नर, घोडेगाव, तळेघर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ हा आंबेगाव तालुक्यातील एकूण १६ पेसा अंतर्गत आदिवासी गावांमधून जाणार आहे. या दुपदरी महामार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्या अनुषंगाने बाधित गावांत ग्रामसभा आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. मात्र नियमांना तिलांजली देऊन प्रांताधिकारी व तहसीलदार हे सरपंच व ग्रामसेवकांना तयार ठरावाचा मसुदा देत ठराव लिहून घेत आहेत. हे बेकायदेशीर आहे. तसेच आधी ठराव द्या व नंतर विचारविनिमय करु असा दबाव आणत असल्याचा आरोप आदिवासी सुरक्षा व विकास असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र तळपे यांनी केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
या संदर्भातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून आजही दूर असलेल्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी, त्या भागाच्या सामाजिक, नैसर्गिक आणि भौगोलिक संपन्नतेसाठी केलेला पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम (पेसा) कायदा आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असताना महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत. मनमानी पद्धतीने कार्यालयातूनच पेसाचे ठराव लिहून घेत आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.

---
ता. २६ जानेवारीपासून संभाव्य महामार्गाने बाधित होणाऱ्या गावांमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी व स्थानिक अधिकारी यांनी बैठका घेतल्या आहेत. या गावांनी संपादनाबाबत नकारात्मक ग्रामसभा ठराव दिले आहेत. त्यामुळे परत सर्व संबंधितांची ता. ७ एप्रिल रोजी प्रांत कार्यालय, मंचर याठिकाणी बैठक घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. सर्व पंचायतींनी कायद्यातील तरतुदींनुसार पुनर्विचार करुन फेर ठराव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- गोविंद शिंदे, प्रांताधिकारी, आंबेगाव-जुन्नर
---
जानेवारीत राष्ट्रीय महामार्ग पुणे विभाग, प्रांताधिकारी, मंचर व गटविकास अधिकारी, आंबेगाव यांच्या पत्रात पेसाचा उल्लेख आहे. तहसीलदार यांनी तळेघर येथे बोलविलेल्या सभेसंबंधीच्या पत्रातही पेसाचा उल्लेख आहे. मात्र मंचर येथे बोलविलेल्या सभेचे जे पत्र आहे, त्यात पेसा व ग्रामसभा याला बगल देत करण्यात येत असलेली कार्यवाही ही पेसा कायद्याचे उल्लंघन तर आहेच; पण अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेच्या अधिकारावर अतिक्रमण आहे.
- सीताराम जोशी, पेसा अभ्यासक, गोहे, ता. आंबेगाव.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT