पुणे

अत्यल्पभूधारक वाढता वाढता वाढे

CD

पुणे, ता. ११ : पुणे जिल्ह्यातील सरासरी जमीन धारणा क्षेत्र मागील तीन दशकांपासून सातत्याने कमी होऊ लागले आहे. त्यामुळे अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सुमारे तीन दशकांपूर्वी २.२६ हेक्टर (सुमारे पावणेसहा एकर) असलेले सरासरी जमीन धारणा क्षेत्र आता १.२७ हेक्टरवर (सुमारे तीन एकर) आले आहे. जिल्ह्यात आजघडीला तब्बल ४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांकडे प्रत्येकी एक हेक्टरच्या (अडीच एकर) आतच शेतजमीन असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांचे हे प्रमाण एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत ५८ टक्के इतके आहे.

राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने दर पाच वर्षांतून एकदा करण्यात येत असलेल्या कृषी गणना अहवालातून हे उघड झाले आहे. कृषी विभागाच्यावतीने सन १९९१ मध्ये केलेल्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यातील सरासरी जमीन धारणा क्षेत्र हे २.२६ हेक्टर होते. त्यानंतर दर पाच वर्षांनी याप्रमाणे सन २०१५ पर्यंत पाच वेळा कृषी गणना केली आहे. त्यात केवळ सन २००१ चा अपवाद वगळता मागील तीन दशकांपासून जमीन धारणा क्षेत्र सातत्याने कमी होत असल्याचे दिसून आले आहे. कृषी गणना अहवालातील ही आकडेवारी फक्त सन २०१५ पर्यंतची आहे. कोरोना संसर्गामुळे सन २०२० ची कृषी गणना होऊ शकलेली नाही. मात्र, २०१५ नंतरही मोठ्या प्रमाणात जमीन धारणा क्षेत्र घट झाल्याची शक्यता कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटींवर वर्तविली आहे.

असे आहेत निकष
सरकारी नियमानुसार दोन हेक्टरहून अधिक (पाच एकरांपेक्षा जास्त) जमीन धारण करणारा शेतकरी हा बहुभूधारक, किमान दोन हेक्टर (पाच एकर) किंवा त्यापेक्षा कमी आणि एक हेक्टरहून (अडीच एकर) अधिक जमीन असलेला शेतकरी हा अल्पभूधारक आणि एक हेक्टरच्या आत जमीन असलेला शेतकरी हा अत्यल्पभूधारक मानला जातो.

शेतजमीन क्षेत्र घटीची प्रमुख कारणे
- विभक्त कुटुंबपद्धतीत वाढ
- वाढते औद्यौगिकीकरण
- विविध प्रकल्पांसाठी झालेले भूसंपादन
- शेतजमीन विक्रीत झालेली वाढ
- शहरालगतच्या गावांमधील शेतीत गृहप्रकल्पांची वाढती संख्या

क्षेत्रनिहाय शेतकरी संख्या
- पुणे जिल्ह्यातील एकूण शेतकरी- ८ लाख २७ हजार
-अत्यल्प भूधारक शेतकरी- ४ लाख ८५ हजार (५८ टक्के)
- अल्प भूधारक शेतकरी- १ लाख ८९ हजार (२३ टक्के)
- अत्यल्प व अल्प भूधारक मिळून एकूण शेतकरी- ६ लाख ७४ हजार (८१ टक्के)
- बहुभूधारक शेतकरी- १ लाख ५४ हजार (१९ टक्के)

कृषी गणनेनुसार सरासरी जमीन धारणा क्षेत्र
- सन १९९१- २.२६ हेक्टर
- सन १९९६- १.९ हेक्टर
- सन २००१- १.५६ हेक्टर (किरकोळ वाढ)
- सन २००५- १.४५ हेक्टर
- सन २०१०- १.३६ हेक्टर
- सन २०१५- १.२७ हेक्टर
- सन २०२०- कोरोनामुळे कृषी गणना झाली नाही.
(टीप : कृषी गणना दर पाच वर्षांनी केली जाते.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT