पुणे

न्यू टाइम्स, मिलेनियम, सिंहगड सिटी विजयी

CD

पुणे, ता. २७ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटात वाघोली येथील न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा येथील सिंहगड सिटी स्कूल आणि कर्वेनगर येथील मिलेनियम नॅशनल स्कूल यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
सासवड-बोपोडी रस्त्यावरील ट्रिनिटी महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या सामन्यात एमआयटी व्हीजीएसने अतिश टोबरेच्या २९ चेंडूत ३७ धावांच्या मदतीने न्यू टाइम्स इंटरनॅशनलसमोर ७५ धावांचे लक्ष्य ठेवले. राज गडेच्या नाबाद २३ धावांच्या जोरावर ‘न्यू टाईम्स’ने धावांचा सहजरित्या पाठलाग केला आणि ८.३ षटकांत सामना जिंकला. राज गडे सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात सिंहगड सिटीने ‘डॉ. केएचएस’ समोर दहा षटकांत १०५ धावांचे आव्हान ठेवले. अंशुल चिपडेने निर्धाव षटक टाकत दोन गडी बाद केले. सिंहगड सिटीने हा सामना ४१ धावांनी जिंकला. २६ चेंडूत ४१ धावा आणि एक विकेट घेतल्याबद्दल भार्गव जामदार सामन्याचा मानकरी ठरला. मिलेनियम नॅशनल विरुद्ध हचिंग्स यांच्यातील सामना एकतर्फी झाला. मिलेनियमने पहिली फलंदाजी करत अरिन सातपुतेच्या नाबाद ६५ धावांच्या खेळीच्या जोरावर १२८ धावा केल्या. मिलेनियमच्या प्रभावी गोलंदाजीसमोर हिचिंग्सचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. मिलेनियम हा सामना तब्बल ८० धावांनी जिंकला. अरिन सातपुते सामन्याचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक ः
एमआयटी व्हीजीएस ः १० षटकांत २ बाद ७५ (अतिश टोबरे नाबाद ३७, आयुष पाटील २०, तेजस बन्ने १-१८) पराभूत विरुद्ध न्यू टाइम्स स्कूल ः ८.३ षटकांत ३ बाद ७६ (राज गडे नाबाद २३, अंश गवाल १३, अतिश टोबरे १-५, राजयोग काळभोर १-१८).

सिंहगड सिटी ः १० षटकांत ३ बाद १०४ (भार्गव जामदार ४१, राजवीर कामठे नाबाद २१, रेयांश चौधरी १-१५, शौर्य परदेशी १-२०) वि. वि. डॉ.केएचएस ः १० षटकांत ८ बाद ६३ (संचित ढवळे २३, रेयांश चौधरी, अंशुल चिपडे २-०, जिनेश डांगी २-१३, श्री काटके २-१५, भार्गव जामदार १-१२). सामन्याचा मानकरी ः भार्गव जामदार.

मिलेनियम नॅशनल स्कूल ः १० षटकांत १ बाद १२८ (अरिन सातपुते नाबाद ६५, ओजस नवारे ४२, पवन गवळी १-२२) विजयी विरुद्ध हचिंग्स स्कूल ः १० षटकांत ८ बाद ४८ (स्वराज लिंबोरे ९, अर्घ्य मानरीकर २-१, अबीर पाठक २-३) सामन्याचा मानकरी ः अरिन सातपुते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT