पुणे

मैत्रेय ट्रॅव्हल्सचा मालक मोकाटच

CD

पिंपरी/हिंजवडी, ता. २ : हिंजवडीत तीन भावंडांचे बळी घेणाऱ्या खासगी बसच्या दुर्घटनेप्रकरणी मैत्रेय ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक २४ तास उलटूनही मोकाट आहे. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून बसचालकासह दोघांना गुरुवारपर्यंत (ता. ४) पोलिस कोठडी देण्यात आली.
आयटी कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या मद्यधुंद चालकाने सोमवारी (ता. १) भरधाव बस पदपथावर चढविल्याने दोन बहिणी आणि एक भाऊ अशी तीन सख्खी भावंडे मृत्युमुखी पडली. याशिवाय एका महिलेसह तिघे जण जखमी झाले. पोलिसांनी बस चालक नागनाथ राजाभाऊ गुजर (वय ३३, रा. गौरी पार्किंग, चक्रपाणी रोड, भोसरी, मूळ रा. धाराशिव), उपपुरवठादार व व्यवस्थापक भाऊसाहेब घोलप (वय ४८, रा. भोसरी) यांना अटक केली आहे. चालकाची सुरक्षा तपासणी करण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती तसेच मैत्रेय ट्रॅव्हल्सचा मालक यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बस चालकाला पौड न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला गुरुवारपर्यंत (ता. ४ डिसेंबर) पोलिस कोठडी देण्यात आली. या अपघातात दुचाकीस्वार अविनाश हरिदास चव्हाण, नूर आलम आणि विमल राजू ओझरकर जखमी झाले. यातील अविनाश यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाहन मालक व देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांना चालक मद्यधुंद असल्यास अपघात होऊ शकतो आणि लोकांचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव होती. त्यानंतरही त्यांनी चालकाची तपासणी न करता त्याला वाहन चालविण्यास दिले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली.
-----------------------------
या प्रकरणात अद्यापपर्यंत दोघांना अटक केली असून बस मालकाला आरोपी केले आहे. त्याचे नाव निष्पन्नही झाले असून लवकरच त्याला ताब्यात घेणार आहोत.
- बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी पोलिस ठाणे
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT