पुणे

अपक्षांमुळे चुरशीच्या लढती

CD

पुणे, ता. ४ ः जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने काही गटांचे राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील एकूण ७३ गटांसाठी २९९ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी ६१ उमेदवार हे अपक्ष आहेत. बहुतांश गटात प्रमुख लढती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये होत असल्या, तरी स्थानिक पातळीवरील समीकरणे, बंडखोरी आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक इच्छुकांनी पक्षाचा झेंडा बाजूला ठेवत अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षांची विभागणी झाल्यानंतर अनेक इच्छुकांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकांमधील अनुभवावरून दोन्ही राष्ट्रवादीकडून एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. परिणामी, निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेकांनी अपक्षाचा पर्याय निवडला आहे. त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यांत प्रत्येकी १४ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दौंड तालुक्यातही आठ अपक्ष उमेदवार असल्याने तेथेही लढती अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. खेड व हवेली तालुक्यांत प्रत्येकी चार, तर जुन्नर, शिरूर आणि भोर तालुक्यांत प्रत्येकी तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मुळशी व पुरंदरमध्ये प्रत्येकी दोन, तर मावळ आणि राजगड तालुक्यांत प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या उमेदवारांची थेट लढती होत असल्या, तरी अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणात मते घेऊ शकतात. परिणामी, विजय-पराजयाचे अंतर अत्यंत कमी राहण्याची शक्यता असून, अपक्षांचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो.

तीन तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरुद्ध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. दोन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढविण्याची भूमिका घेतली असली तरीही आंबेगाव, मावळ आणि मुळशीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत. तसेच, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत ५८ ठिकाणी रंगणार आहे.

जिल्हा परिषदेच्या रिंगणातील पक्षनिहाय उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस - ७२
भाजप - ५८
राष्ट्रवादी श.प पक्ष -- ७
काँग्रेस - १५
शिवसेना - ३९
शिवसेना उबाठा पक्ष - २६
अपक्ष - ६१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्यानिमित्ताने वक्तव्य

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT