पुणे

पक्षपात न करता तीनही तालुक्यांत विकासकामे करणार

CD

धोंडीबा कुंभार
पिरंगुट, ता. २४ : ‘‘मुळशी प्रादेशिक पाणी योजना टप्पा क्रमांक दोनची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. मुळशीतील पूर्व पट्ट्यातील अनेक गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी ही योजना लाभदायक आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून ही योजना लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मतदारांनी संधी दिल्यामुळे येत्या पाच वर्षांत कोणताही पक्षपात न करता या मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेऊन विकास करणार आहे,’’ असे आश्‍वासन नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार मांडेकर यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधून त्यांचे विकासाचे व्हीजन जाणून घेतले.
मांडेकर म्हणाले, ‘‘भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघ मोठा असला, तरी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोर-राजगड-मुळशी तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवणे, वाहतुकीसाठी चांगले रस्ते, आरोग्य, पाणी, गड-किल्ले संवर्धन, अग्निशमन केंद्र यासाठी भरीव काम करणार आहे. भोरसाठी एमआयडीसी, राजगड कारखाना, राजगड तालुक्यात पर्यटनवाढ व रोजगारनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणार.’’
२००१ साली मुळशीतील चांदे गावच्या सरपंचपदापासून सुरू केलेला राजकीय प्रवास आज आमदारकीपर्यंत पोहोचला आहे. जिल्हा परिषदेचा सदस्य असताना पंचायत समिती गण व जिल्हा परिषदेच्या गटातील बहुसंख्य गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शेकडो कोटींची मूलभूत विकासकामे केलेली आहेत. इतकेच काय मुळशीतील विविध गावांत मोठा निधी उपलब्ध केला आहे. त्यामध्ये मुख्यत्वेकरून छोटे साकव, ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज यासाठी भरीव काम केलेले आहे. सभामंडप, लघू पाटबंधारे, पाणी योजना, तसेच शिवस्मारक बांधले.
भोर मतदार संघातील रस्ते, पाणी, वीज आदी समस्या अद्यापही तशाच आहेत. विकासाला चालना देण्यासाठी रस्त्यांची सुधारणा करणे गरजेचे आहे. मुळशीतील कोकणात जाणारा चांदणी चौक ते माले या दरम्यानचा महामार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही. अनेक ठिकाणी त्याची कामे अर्धवट आहेत त्यामुळे या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करणार आहे. प्रचार करताना विरोधकांनी केलेल्या आरोपांना महायुती सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास करून चोख उत्तर देणार आहे.

विकासाचा अजेंडा
भोर मतदारसंघातील वाड्यावस्त्यांवरील मूलभूत प्रश्‍नांची सोडवणूक करणार
रायरेश्‍वर किल्ल्यावरील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार
चेलाडी फाटा ते मढे घाट हा रस्ता मार्गी लावणार
राजगड तालुक्यातील विविध विकासकामे मार्गी लावणार
तीनही तालुक्यातील विकासकामांना सारखाच न्याय देणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT