पुणे

कोयते दाखवून दहशत पसरविणाऱ्या दोघांना अटक

CD

राजगुरुनगर, ता. २४ : गाड्या व घराचे दरवाजे फोडत लोकांना कोयता दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना खेड पोलिसांनी कोयत्यांसह अटक केली. साहिल नाशिकेत टाकळकर (वय २०) व प्रतीक दत्तात्रेय टाकळकर (वय २२, दोघे रा. टाकळकरवाडी, ता. खेड) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत विशाल कोठावळे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगरजवळच्या टाकळकरवाडी, भांबुरेवाडी व ढोरेवाडी परिसरात साहिल व प्रतीक हे दोघेजण गेल्या काही दिवसांपासून चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून गाडीतील लोकांना कोयता दाखवून दहशत निर्माण करीत होते. भांबुरेवाडी येथील सत्यवान भांबुरे यांच्या घरी कोयते घेऊन गेले व घराचा दरवाजा तोडून त्यांच्या दुचाकीची तोडफोड केली. टाकळकरवाडी येथील एका चारचाकीच्या काचा कोयत्यांनी फोडल्या. या घटनांमुळे परिसरात लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. याबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रारी येत होत्या. त्यानुसार खेडचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भारत भोसले, पोलिस संतोष मोरे, संतोष घोलप, योगेश भंडारे, विजय शेळके, बाळकृष्ण साबळे यांनी सापळा रचून या दोघांना अटक करत त्यांच्याकडील दोन कोयते जप्त केले. पोलिस हवालदार बाळकृष्ण साबळे अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईसाठी ऋतुराज-रहाणेकडून दमदार सुरुवात; पंजाबच्या गोलंदाजांचा विकेट्ससाठी संघर्ष

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT