राजगुरुनगर: परिसरातील पुणे-नाशिक महामार्गालगतच्या पानमळा वस्ती परिसरात पोलिसांनी बुधवारी दोन लॉजवर छापा टाकून अनैतिकदेह व्यापार करणाऱ्या अल्पवयीन तीन तरुणींना ताब्यात घेतले, तर दोन जणांना अटक केली.
याबाबत पोलिस हवालदार रमेश दाते यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुणे-नाशिक महामार्गालगतच्या पानमळा येथे लॉज चालक परराज्यातील तरुणींकडून अनैतिकदेह व्यापार करवून घेत होते.
याबाबत खेड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे, पोलिस हवालदार सुनील बांडे, रमेश दाते, असे पोलिस पथक तयार करण्यात आले.
या पथकाने पानमळा येथील काही लॉजवर छापेमारी केली. त्यामध्ये गंधर्व लॉज व साई समर्थ लॉज येथे तीन अल्पवयीन युवती अनैतिक देहव्यापार करताना आढळल्या. त्या तिघींना ताब्यात घेतले. तसेच दोन्ही लॉजचालकांना अटक केली.
आशिष सांडभोर व कुणाल सांडभोर अशी अटक केलेल्या लॉजचालकांची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या मानवी तस्करी विरोधी कलमान्वये आणि स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
यातील संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. तर अल्पवयीन तरुणींना सुधारगृहात पाठविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.