पुणे

खेडमधील १४४ ग्रामपंचायतींसाठी सोडत

CD

राजगुरुनगर, ता. ७ : खेड तालुक्यातील १४४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदांची पुन्हा आरक्षण सोडत सोमवारी (ता. ७) राजगुरुनगर येथे घेण्यात आली. यापूर्वी २३ एप्रिल रोजी सोडत झाली होती. त्यात चूक झाल्यामुळे पुन्हा सोडत घेतल्याचे सांगण्यात आले.
खेड तालुक्यात १६२ ग्रामपंचायती आहेत. त्यातील १८ ग्रामपंचायतीची सरपंचपद आरक्षण सोडत यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. त्यामुळे उर्वरित १४४ सरपंचपदांची आरक्षण सोडत तहसीलदार प्रशांत बेडसे व नायब तहसीलदार राम बीजे यांच्या उपस्थितीत राजगुरुनगर येथे झाली. यावेळी राजकीय पदाधिकारी व विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सन २०२५ ते सन २०३० साठी सरपंच आरक्षण काढण्यात आले. ते पुढीलप्रमाणे : अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती महिला : आव्हाट, खरपूड, कुडे बुद्रुक, घोटवडी, टोकावडे, धामणगाव खुर्द, धुवोली, नायफड, परसुल, भोरगिरी, शेंदुर्ली. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती अनुसूचित जमाती : एकलहरे, खरोशी, गोरेगाव, डेहणे , भोमाळे, मोरोशी, वांद्रा , शिरगाव, साकुर्डी, सुरकुंडी.
बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती महिला : आंभू, मिरजेवाडी, दावडी, गारगोटवाडी, खरपुडी खुर्द, औंढे.
बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती : दरकवाडी, नाणेकरवाडी, तुकाईवाडी, अहिरे, आडगाव.
अनुसूचित जाती महिला : निघोजे, मरकळ, शिंदे, चास, सुपे.
अनुसूचित जाती : वहागाव, कळमोडी, चिखलगाव, तिफणवाडी.
नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला : कोयाळीतर्फे वाडा, कान्हेवाडी बुद्रुक, जऊळके बुद्रुक, शिरोली, वाकी खुर्द, शिवे, रासे, सातकरस्थळ, भोसे, वाजवणे, मेदनकरवाडी, साबळेवाडी, दौंडकरवाडी, चिंचबाईवाडी, वरची भांबुरवाडी, कुरकुंडी, कान्हेवाडीतर्फे चाकण.
नागरिकाचा मागास प्रवर्ग : रोहकल, वाडा, निमगाव, भांबोली, हेद्रूज, चांडोली, कनेरसर, देवोशी, करंजविहिरे, वरुडे, मोई, कडधे, पिंपरी बुद्रुक, बिरदवडी, सांडभोरवाडी.
सर्वसाधारण : साबुर्डी, बीबी, बहिरवाडी, वेताळे, येणिये खुर्द, तळवडे, वाघू, मोहकल, वि-हाम, कोळीये, वासुली, रेटवडी, सांगुर्डी, पाळू, महाळुंगे, पांगरी, केळगाव, चिंबळी, कुरुळी, अनावळे, शेलगाव, काळूस, बहुळ, टाकळकरवाडी, मांजरेवाडी, आखरवाडी, राक्षेवाडी, कोरेगाव बुद्रुक, कुडे खुर्द, गाडकवाडी, संतोषनगर, येलवाडी, कोरेगाव खुर्द, आंबोली, चऱ्होली खुर्द, पूर.
सर्वसाधारण महिला : जैदवाडी, आसखेड खुर्द, वराळे, औदर, गोसासी, रानमळा, दोंदे, देशमुखवाडी, शेलू, कमान, कडूस, वाळद, वडगाव न. खेड, गोनवडी, धानोरे, होलेवाडी, गोलेगाव-पिंपळगाव, येणिये बुद्रुक, चिंचोशी, वाफगाव, पिंपळगाव तर्फे खेड, कोयाळीतर्फे चाकण, पाडळी, चांदूस, सिद्धेगव्हाण, किवळे, पापळवाडी, वाकी बुद्रुक, खरपुडी बुद्रुक, ढोरेभांबुरवाडी, गडद, तोरणे बुद्रुक, कोहिनकरवाडी, वाकळवाडी, सावरदरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४०० धावांचा विक्रम का मोडला नाही? Wiaan Mulderने सांगितली मन जिंकणारी गोष्ट; म्हणाला, ब्रायन लारा..

Latest Maharashtra News Updates : एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडीने चाकरमान्यांचे हाल

Mobile Recharge : मोबाईल वापरकर्त्यांना झटका! रिचार्जचे दर 10-12% ने पुन्हा महागणार, कोणत्या कंपनीचे किती पैसे? जाणून घ्या..

11th Admission : इ. ११ वी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू; पसंतीक्रम लॉक करण्यासाठी १० ते १३ जुलैची मुदत

'त्या जागी जाऊन पुन्हा तुमची आठवण आली' तेजश्रीने बसस्टॉपवरचे फोटो केले शेअर, नेटकरी म्हणाले...'यावेळी तरी अर्ध्यात मालिका सोडू नको'

SCROLL FOR NEXT